Ticker

6/recent/ticker-posts

आष्टे डू मर्दानी आखाडा राज्यस्तरीय स्पर्धेत भगवान महाविद्यालयाच्या रेणुका डोके हिला रौप्यपदक

आष्टी (प्रतिनिधी) क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद भंडारा जिल्हा व भंडारा जिल्हा अष्टे डू आखाडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन मर्दानी खेळ शालेय अष्टे डू आखाडा क्रीडा स्पर्धा २०२३- २०२४ नुकत्याच मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी भंडारा जिल्ह्यातील तुमसर या ठिकाणी उत्साहामध्ये पार पडल्या. या स्पर्धेमध्ये १९ वर्षे वयोगट मुलीमध्ये येथील भगवान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. रेणुका डोके हिने शिवकला या प्रकारामध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून रौप्य पदक पटकावले. आष्टी तालुक्यातील मातकुळी सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या रेणुका डोकेचे या यशाबद्दल विविध स्तरातून कौतुक होत आहे.या यशाबद्दल शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष,शिक्षणमहर्षी व क्रीडाप्रेमी माजी आ. भीमराव धोंडे यांनी रेणुकाचे कौतुक करून दिल्ली येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रेणुकाला शुभेच्छा दिल्या आहेत.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ उपप्राचार्य डॉ.ज्ञानदेव वैद्य,उपप्राचार्य डॉ.आप्पासाहेब टाळके,क्रीडा विभाग प्रमुख व मार्गदर्शक डॉ.दीपक टेकाडे,शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.सूर्यकांत धोंडे,डॉ.बापू तोरडमल,प्रा.जफर शेख,प्रा.अजहर शेख, प्रा.ज्ञानदेव गाडे,सचिन वाळके,प्रा.भरत गर्जे,राजू पाचे,प्रा.जयश्री बोडखे,प्रा.छाया गोरे, प्रा.राजश्री सोनवणे व पप्पू उर्फ विठ्ठल गोरे यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या