आष्टी (प्रतिनिधी)
आष्टीचे माजी जि.प.सदस्य डाॕ.आर.डी.शिंदे यांचे चिरंजीव आष्टीचे
सुपुत्र पुण्यातील प्रथितयश अॕड. सुनिल रघुनाथ शिंदे (वय ६२ ) यांचे अल्पशा आजाराने
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हाॕस्पीटलमध्ये दि.२४ फेब्रुवारी रोजी निधन
झाले.त्यांच्यापाठीमागे पत्नी श्रीमती उज्ज्वला सुनिल शिंदे,मुलगा रुषीकेश
शिंदे,मुलगी डाॕ.संजना शिंदे,लहाण भाऊ बाळासाहेब उर्फ सुरेंद्र शिंदे असा मोठा
परिवार आहे.आष्टी येथील जि.प.मुलांचे हायस्कुलमध्ये शालेय वा हंबर्डे महाविद्यालयात
महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करुन पुणे येथील आयएलएस विधी महाविद्यालयात एलएलबीची
पदवी घेतली.गेली ३५ वर्षे पुण्यात वकीली व्यवसाय केला.आष्टी शहर आणि तालुक्यातील
युवकांना शैक्षणिक मदत प्रवेश प्रक्रिया यामध्ये ॲड. सुनिल शिंदे हे नेहमी मदत करीत
असत. जन्मगाव साकत (ता.आष्टी) येथे सोमवार दि.४ मार्च रोजी सकाळी ८ वा.दशक्रियाविधी
होणार आहे.यावेळी प्रवचन होणार आहे. ॲड.सुनिल शिंदे यांंच्या निधनाबद्दल आ.सुरेश
धस,आ.बाळासाहेब आजबे,माजी आ. भीमराव धोंडे ,माजी आ.साहेबराव दरेकर यांनी
श्रध्दांजली अर्पण केली.
0 टिप्पण्या