

आष्टी
आष्टी (प्रतिनिधी)
शिक्षण क्षेत्रातील ३८ वर्षे सेवा झाल्यानंतर आपल्या हातीन अनेक
आदर्श विद्यार्थ्थी घडले आहेत.आपल्या आयुष्यातील ही मौलिक सेवा आहे. आपल्या
सेवेवरची निष्ठा आपल्याकडून काम करवून घेत असते.कौटुंबिक आयुष्यासाठी जी धडपड सुरु
असते त्याची सफलता त्या परिश्रमात दडलेली असते सेवापूर्ती होणाऱ्या कर्मचाऱ्याचा
सेवागौरव होणे महत्त्वाचे असते. शिक्षण विभागात शिक्षीका व मुख्याध्यापिका पदावर ३८
वर्षे प्रभावी व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे उत्कृष्ट सेवा करणाऱ्या
मुख्याध्यापिका सौ.आशा बाळासाहेब कुलकर्णी - पत्की यांचे उल्लेखनीय काम आहे.शालेय
विद्यार्थ्यांंबरोबरच त्यांनी आपल्या पाल्यांवरही सुसंस्कार घडविलेले आहेत.त्यांचे
पाल्य उच्च पदस्थ आहेत पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात प्रमाणिकपणे केलेल्या कामाची ती
पावतीच आहे. मुख्याध्यापिका श्रीमती आशा पत्की यांनी अनेक आदर्श विद्यार्थी घडविले
असे प्रतिपादन पूर्व शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे यांनी केले. आष्टी तालुक्यातील
के.प्रा.शा.ब्रम्हगांव शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.आशा बाळासाहेब कुलकर्णी - पत्की
यांंच्या सेवापूर्ती सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी विठ्ठलराव
बन्सोडे ,नामदेव राऊत,गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव,संपत धोंडे,पी.वाय.काळे,
पोपटराव घुले,ब्रम्हगांवचे सरपंच रोहिदास पवार,पत्रकार उत्तम बोडखे, शरद रेडेकर,
प्रा.सुभाष रासकर, मुख्याध्यापक विष्णु नन्नवरे,स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे माजी
व्हाईस चेअरमन गो.बा.सायकड,सहाय्यक निंबधक कार्यालयातील अधिक्षक बाळासाहेब
राऊत,सेवानिवृत्त सहकार अधिकारी रामराव झांजे,भीमराव गुरव,विठ्ठलराव मुटकुळे,बबन
मोरे, शांतीनाथ आजबे, शरद आजबे, गटसचिव बांधव आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी
प्रस्ताविक मुख्याध्यापक विष्णु नन्नवरे यांनी केले.यावेळी स्वामी विवेकानंद
पतसंस्थेचे संचालक स्वानंद थोरवे,गटशिक्षण शिक्षण अधिकारी सुधाकर यादव,
सौ.मंगलप्रभा तांदळे, श्रीमती लितीका तरटे,माजी सरपंच नामदेव राऊत,पत्रकार उत्तम
बोडखे, श्रीमती उज्ज्वला धोंडे,आदर्श शिक्षक पी.वाय.काळे,ब्रम्हगांव शाळेतील
विद्यार्थ्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी अध्यक्षीय समारोप करताना विक्रम
पोकळे म्हणाले की, श्रीमती आशा पत्की यांनी शैक्षणिक तसेच प्रशासकीय काम उत्कृष्ट
केलेले आहे.त्यांनी आपल्या विद्यार्थ्थीवर उत्तम संस्कार घडविले आहेत.अनेक आदर्श
विद्यार्थ्थी घडविलेले आहेत.आपल्या पाल्यांवर चांगले संस्कार करीत त्यांना उच्च
प्रतिचे शिक्षण दिले आहे.आपल्या सेवाकालात त्यांनी खुप त्याग व कष्ट घातले
आहेत.श्रीमती पत्की मॕडमच्या शैक्षणिक कार्याचा आदर्श सर्व नवोदित शिक्षकांनी
घ्यावा.सर्व शिक्षकांनी शाळेत नियमीतपणे यावे व पुर्ण वेळ थांबावे व अभ्यासपूर्ण
अध्यापक करावे असेही आवाहन पोकळे यांनी यावेळी केले. यावेळी सत्काराला उत्तर देताना
आशा पत्की मॕडम म्हणाल्या की,माझ्या आई वडीलांमुळेच मी शिक्षिका झाले.मला माझ्या ३८
वर्षाच्या सेवकालात सर्व सहकारी शिक्षक,शिक्षिका यांनी मोलाचे सहकार्य केलेले
आहे.माझे लग्नानंतर सर्व शिक्षण माझे पतीराज बाळासाहेब कुलकर्णी यांनी केलेले आहे.
त्यांच्या सहकार्यामुळेच शिक्षण क्षेत्रात चांगले कार्य करु शकले.मुख्याध्यापिका
असताना बॕँकेचे व्यवहार व ईतर पत्रव्यवहार करण्यास बाळासाहेब कुलकर्णी यांची मोठी
मदत मिळल्याचे मुख्याध्यापिका श्रीमती पत्की मॕडम यांनी यावेळी सांगीतले.यावेळी
सूत्रसंचालन स्वानंद थोरवे व आनंद मोरे यांनी आटुळे सर यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या