Ticker

6/recent/ticker-posts

क-हेवाडी येथील हरिनारायण स्वामी विद्यालयाला दिला आयसीआयसीआय फाऊंडेशनने सोलर युनिट प्रकल्प*

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील कऱ्हेवाडी येथील हरिनारायण स्वामी विद्यालय येथे आय.सी. आय.सी.आय.फाऊंडेशन आणि आय.सी.आय.सी. आय.लोम्बार्डच्यावतीने हरिनारायण स्वामी विद्यालयाला सौर ऊर्जा प्रकल्प देण्यात आला.या सोलर युनिट प्रकल्पाचे उद्घाटन आय.सी.आय. सी.आय.फाऊंडेशनचे जिल्हा विकास अधिकारी चेतन पाटोळे, तालुका समन्वयक यशवंत बहिरम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी इतर प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली.ग्रामीण भागातील शाळेस रेन वॉटर हार्वेस्टिंग,मुला -मुलींकरिता स्वच्छतागृह, सोलर पॅनल,अस्ट्रोनॉमी लॅब या सुविधा आय.सी. आय.सी.आय.फाऊंडेशन पुरवते त्याचाच भाग म्हणून कऱ्हेवाडी येथे सोलर पॅनल सिस्टीम देण्यात आली.यावेळी संस्थेचे संस्थापक माजी आ.भीमराव धोंडे यांनी कामाचे कौतुक केले. याप्रंसगी शाळेचे मुख्याध्यापक संतोष नवले,पंजाब बांगर, श्रीमती बबीताताई धोंडे,संजय राऊत, भारत दळवी,सेवक बाळू भोपळे,रामदास सांगळे सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य,आय.सी.आय.सी.आय.फाऊंडेशने केलेल्या कामाचे गावातील पालक वर्गाकडून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या