Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी (प्रतिनिधी ) आष्टी तालुक्यातील शेकापूर येथे असलेल्या गोपालन गुरुकुल सनातन आश्रम येथील गोशाळेला आष्टी तालुका दूध उत्पादक संघाचे माजी चेअरमन आणि आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती आदिनाथ सानप आणि त्यांच्या मित्रमंडळींनी आ. सुरेश धस यांनी सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करावा या केलेल्या केलेल्या आवाहनानुसार ५ टन ऊस आणि उसाचे वाढे हा चारा वाटप करून आदर्श सामाजिक उपक्रम राबवला आहे. आष्टी तालुक्यामध्ये गेली बारा वर्षांपासून परमेश्वर शास्त्री लाड महाराज यांनी शेकापूर येथे गुरुकुल सनातन गोपालन आश्रम सुरू केला आहे. त्याठिकाणी गोपालनाचे काम ते करत असतात या गोशाळेमध्ये सध्या ९५ गाई आहेत. त्यांच्या चाऱ्याचा आणि पशुखाद्याचा मोठा खर्च असूनही संस्कृत पंडित असलेले ह.भ.प. परमेश्वर लाड महाराज हे अत्यंत मितभाषी असून ते कोणाकडेही कसल्याही आर्थिक मदतीसाठी अपेक्षा व्यक्त करत नाहीत. त्यांच्या प्रयत्नातून ते या गाईंना जगवण्याचा प्रयत्न करत असतात सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे चाराटंचाई आणि पाणीटंचाई भासण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी चेअरमन आदिनाथ सानप यांच्याशी याबाबत चर्चा केली.दरम्यान आ.सुरेश धस यांनी त्यांचा वाढदिवस हा मोठे फलक,जाहिरात बाजी,बँड बाजा हा अनावश्यक खर्च न करता समाजोपयोगी आणि सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत आष्टी तालुका दुध संघाचे माजी चेअरमन आणि आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती आदिनाथ सानप यांनी त्यांच्या मित्रमंडळींशी याबाबत चर्चा केली असता मराठवाडा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष संजय मेहेर आणि त्यांचे बंधू पंडित दीनदयाळ उपाध्याय सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सुनील मेहेर यांनी तात्काळ अनुकूलता दर्शवत या गुरुकुल गोपालन आश्रम शाळेतील जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला. येथील मोठ्या प्रमाणावर गाई असल्यामुळे त्यांना त्यांनी ५ टन ऊसाचा चारा उपलब्ध करून दिला आहे आणि वेळोवेळी पुढील काळामध्ये या गुरुकुल गोपालन सनातन आश्रमातील जनावरांसाठी इतर गावांमधील समाज बांधवांकडून गायींच्या चाऱ्यासाठी पशुखाद्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे आणि त्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. अशा प्रकारच्या या सामाजिक उपक्रमाद्वारे गोपालन गुरुकुल सनातन आश्रमातील गाईंसाठी चारा उपलब्ध करून दिल्याबद्दल या आश्रमाचे संचालक परमेश्वर महाराज लाड यांनी सर्वांचे आभार मानले असून यापुढे देखील असेच सहकार्याची अपेक्षा केली आहे. चौकट ----------- ह.भ.प.परमेश्वर महाराज लाड हे संस्कृत पंडित असून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेकापूर येथे गुरुकुल गोपालन सनातन आश्रमाची स्थापना केलेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाईंचे संगोपन केले जाते अनेक ठिकाणच्या कत्तल खान्याकडे जात असलेली जनावरे पोलीसांकडून संगोपनासाठी या आश्रमामध्ये आणून सोडली जातात त्यासाठी या आश्रमाला अर्थसाह्याची अत्यंत आवश्यकता आहे. --------- -----संजयशेठ मेहेर ( (उपाध्यक्ष- मराठवाडा व्यापारी महासंघ) ------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या