बोडखे उत्तमराव आष्टी (प्रतिनिधी)
प्रचंड जिद्द,चिकाटी,धैर्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर शेतीमध्ये
विविध प्रयोग करत उत्पादित फळबाग शेती केली तर आर्थिक सुबत्तता येते.गेली अनेक
वर्षापासुन वाघुले परिवार पारंपरिक शेतीला फाटा देत फळबागेकडे वळला आहे.देशामध्ये
शेतमाल पिकविण्यासाठी संशोधन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. शेतकऱ्यांनी त्या
संशोधनाचा शेती करण्यासाठी वापर करावा.आपली अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून
असल्याने शेतकरी सुधारला तर देश सुधारेल अशी परिस्थिती आहे.शेतकऱ्यांनी नवनवीन
तंत्रज्ञान अवगत करून त्या तंत्रज्ञाना आधारे शेती केल्यास नक्कीच फायदेशीर ठरू
शकते. ही बाब लक्षात घेत पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक यंत्र तंत्रांच्या
माध्यमातून शेतीच बनवली फळबागांची प्रयोगशाळा अशी स्थिती आष्टी तालुक्यातील
प्रगतिशील शेतकरी विष्णू मारुती घुले यांनी बनवली आहे. त्यांच्या या विशेष कृषी
क्षेत्रातील कर्तुत्वाचा आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आदर्श घेतला
आहे.शेतकऱ्यांनी बाजारात येणारी बिगर केमिकल औषधे वापरून दर्जेदार शेतमाल तयार केले
पाहिजे. आष्टी तालुक्यात रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड हा उपक्रम प्रायोगिक
तत्त्वावर राबविला होता.
*आर्थिक उन्नतीसाठी फळबागा हाच पर्याय!*
-------------------------------
उपक्रमाचा आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या
प्रमाणात लाभ घेतल्याने आता तालुक्यात फळबागां वाढल्या आहेत.त्यामध्ये अंबा
,लिंबु,चिक्कु,मोसंबी,संत्रा,पेरु,सिताफळ बागा वाढल्या आहेत.संत्रा उत्पादकांच्या
आर्थिक उन्नतीसाठी फळविक्रेते वाढत आहेत.बाजारपेठ उपलब्ध होत आहे. चांगल्या
प्रकारचा दर्जा असलेले लिंबु,संत्रा या मालाची तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादन
घ्यावे.हे लिंबू नेपाळ,दिल्ली इतर मोठ्या मोठ्या शहरात जाईल यातून चांगला भाव मिळेल
असा विश्वास विष्णु वाघुले व त्यांचे बंधु सेवानिवृत्त प्राचार्य भगवान वाघुले दिला
आहे.
*शेरी बुद्रुक हे फळबागांची प्रयोगशाळा!*
------------------------------

आष्टी तालुक्यात लिंबू,संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्याने छोट्या
मोठ्या व्यापाऱ्यांनी इतरत्र व्यवसाय करण्यापेक्षा कडा,आष्टीत व्यवसाय करावा.आष्टी
तालुक्यातील शेरी बु.हे विविध प्रयोग करणारे शेतकऱ्यांचे प्रसिद्ध गाव आहे.शेरी
बु.येथील प्रयोगशील शेतकरी विष्णु वाघुले यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग राबविण्यास
सुरुवात केली आहे.
*पेरू चिकू आंबा लिंबू फळांना मागणी*
-----------------------------
विविध शेती क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करून आणि
उत्पादित मालासंदर्भात कला अवगत केली आहे. शेतकरी स्वबळावर स्वावलंबी जीवनाचा मार्ग
धरू लागला आहे.शेतीनिष्ठ शेतकरी विष्णु वाघुले यांनी पपई,पेरु,
चिक्कु,अंबा,लिंबु,संत्रा आदीसह फळबागेची उत्तम पिके सेंद्रिय खतावर उत्पादित केले
आहेत.
*सेंद्रिय खताचा वापर; आरोग्याला हितकारक* -
------------------------------
सेंद्रिय खतामुळे उत्पादनही चांगले मिळते.सेंद्रिय पद्धतीने उत्पादन प्रयोग करणारे
आष्टी तालुक्यातील अनेक शेतकरी आहेत.महत्त्वाचा प्रयोग म्हणून नावारूपाला येत
आहे.भविष्यात याला उत्तम प्रतिसाद मिळत व्यापाऱ्यांच्या मध्यस्तांमुळे शेतकरी आणि
ग्राहकांचा होणारा तोटा बंद होणार आहे.सेंद्रिय खतामुळे उत्पादित झालेला माल शरीरास
अत्यंत फायदेशीर असतो.उलट केमिकल खते वापरून उत्पादित केलेल्या मालामुळे शरीरास
अपाय व धोका पोहोचू शकतो.त्यामुळे सेंद्रिय खतांमुळे निर्मिती झालेला माल
ग्राहकांनी खरेदी करावा असे आवाहन वाघुले यांनी केले. *शेत मालात संशोधन होण्याची
गरज* ----------------------------- देशामध्ये शेतमाल पिकविण्यासाठी संशोधन मोठ्या
प्रमाणावर झाले आहे.शेतकऱ्यांनी त्या संशोधनाचा शेती करण्यासाठी वापर करावा.आपली
अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून असल्याने शेतकरी सुधारला तर देश सुधारेल अशी
परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून त्या तंत्रज्ञाना आधारे
शेती केल्यास नक्कीच फायदेशीर ठरू शकते. शेतकऱ्यांनी बाजारात येणारी बिगर केमिकल
औषधे वापरून दर्जेदार शेतमाल तयार केले पाहिजे. आष्टी तालुक्यात रोजगार हमी योजने
अंतर्गत फळबाग लागवड हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविला होता.त्या उपक्रमाचा
आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याने आता तालुक्यात
फळबागां वाढल्या आहेत. त्यामध्ये अंबा,लिंबु,चिक्कु,मोसंबी, संत्रा,पेरु,सिताफळ
बागा वाढल्या आहेत.संत्रा उत्पादकांच्या आर्थिक उन्नतीसाठी फळविक्रेते वाढत
आहेत.बाजारपेठ उपलब्ध होत आहे. चांगल्या प्रकारचा दर्जा असलेले लिंबु,संत्रा या
मालाची तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादन घ्यावे.हे लिंबू नेपाळ,दिल्ली इतर मोठ्या
मोठ्या शहरात जाईल यातून चांगला भाव मिळेल असा विश्वास विष्णु वाघुले व त्यांचे
बंधु सेवानिवृत्त उपप्राचार्य भगवान वाघुले दिला आहे.या संत्रा बागेस लातुरचे
प्रा.डाॕ.विभुते सर आणि मित्र परिवाराने काल भेट देऊन पाहणी केली.
0 टिप्पण्या