
मनोभावे,पवित्र मनातून,श्रद्धायुक्त भावनेने,सातत्यपूर्ण आणि नतमस्तक होत
भक्तिभावाने पूजा व आराधना केल्यास निश्चित फलप्राप्ती होते.या आजपर्यंतच्या एकूण
स्थितीवरून आष्टी तालुक्याच्या ब्रम्हगांवच्या डोंगर माथ्यावर भव्यदिव्य आणि
निसर्गाच्या हिरव्यागार शालु पांघरलेल्या आणि मंदिरात स्थिरावलेली लाखो भाविक
भक्तांची लाडकी देवी अर्थात देखण्या शृंगेरीमातेच्या दर्शनासाठी यात्रोत्सवात
भक्तांची अलोट गर्दी असते.आठेगाव पुठ्याच्या श्रीक्षेत्र सावरगाव घाटपासून मुगगांव
आणि तिकडे जाताना ब्रम्हगांवच्या डोंगर माथ्यावर अत्यंत दिमाखदार आणि भव्य दिव्य
अशा सुंदर माथ्यावर शृंगेरेदेवीची सुंदर मूर्ती भाविकांचे ध्यान आकर्षित करते
आहे.वर्षभरातील वर्षभरातील अत्यंत महत्त्वाच्या यात्रा उत्सव माता शृंगेरी देवीची
आराधना हा भक्तांना एक अत्यंत आनंदाचा सोहळा असतो.भक्तांनी केलेले नवस या
निमित्ताने येथे सदैव पूर्ण होतात अशी भक्तांची भावना आहे आणि पूर्ण झालेले नवस
फेडण्यासाठी आणि नतमस्तक होण्यासाठी भाविकांची मांदियाळी हा येथील या देवीच्या
पवित्र पावन भूमीत नित्याचा भाग आहे.आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथे असलेल्या
श्रृंगेरीदेवी देवस्थान दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव साजरा होणार आहे
या उत्सवादरम्यान देवस्थान येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.आष्टीपासुन
१२ कि.मि.अंतरावर आष्टी,पाटोदा तालुक्याच्या सिमेवर अतिशय निसर्गरम्य वातावरणात
श्रृंगरीदेवी देवीदास हे जागृत देवस्थान आहे.श्रृंगेरीदेवी देवस्थानावर वर्षभर
विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात.यामध्ये पौष महिन्या होणार यात्रा उत्सव आणि
नवराञ उत्सव हे दोन महत्वाचे उत्सव आहेत. सर्वाधिक कालावधीचा पौष उत्सव!
------------------------------- पौष महिन्यातला यात्रा उत्सव १५ दिवस चालतो म्हणुन
सर्वाधिक काळ चालणारा यात्रा उत्सव म्हणुन प्रसिध्द आहे.श्रृंगेरीदेवी देवस्थानावर
नेहमीच भक्तांची वर्दळ असते परंतु यात्रा उत्सव आणि नवरात्र उत्सवात देवीच्या
दर्शनासाठी राज्यभरातुन मोठ्या प्रमणात भक्त येतात.त्यामळे या दोन उत्सवांना वेगळे
महत्व आहे.दरवर्षी होणाऱ्या यात्रोत्सवात सर्वत्र हिंदू धर्म दैवतांची आराधना केली
जाते.अत्यंत पवित्र अशा या कालावधीमध्ये प्रत्येक भक्त भाविक सज्जन नतमस्तक होऊन
समाधान घेत असतो. देवीचे आशीर्वादासाठी प्रत्येक जण आतुर असतो. यात्रोत्सवात
भाविकांच्या लाडकी असलेल्या श्रंगेरीदेवीच्या पायी नतमस्तक होण्यासाठी आणि आशीर्वाद
घेण्यासाठी मनोभावे आलेली ही मंडळी शृंगेरी देवीच्या चरणी नम्रपणे लीन होत आहे.
श्रृंगेरी देवीच्या यात्रोत्सवात भाविकांची मोठ्यासंख्येने गर्दी
------------------------------- आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव येथील श्रृंगेरी
देवीच्या यात्रा उत्सवास २५ जानेवारीपासुन सुरूवात झाली आहे. तब्बल १५ दिवस
चालणाऱ्या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.आष्टी तालुक्यातील
ब्रह्मगाव येथील श्रृंगेरीदेवी हे पंचक्रोशीतील जागृत देवस्थान आहे.
श्रृंगेरीदेवीगडावर वर्षभरात विविध उत्सव साजरे केले जातात. यामध्ये नवरात्र उत्सव
आणि पौष पौर्णिमेला भरणारा यात्रा उत्सव हे प्रमुख दोन उत्सव आहेत. या वर्षीचा
यात्रा दि.२५ जानेवारीपासुन सुरू झाली आहे.हा याञाउत्सव १५ दिवस चालतो. दर मंगळवार
शुक्रवार या दिवसाशिवाय शनिवार , रविवारी सुट्टी असल्याने भाविकांची मोठ्या
संख्येने गर्दी होत आहे. दि.९ फेब्रुवारीला या यात्रेची सांगता होत आहे.आष्टी येथील
या गडावर जाण्यासाठी आष्टी आगारातून भाविकांच्या मागणीनुसार जादा बस गाड्याची
व्यवस्था करण्यात आलाली आहे. देवस्थानावर आनंद नगरी,खेळण्यांची ,खाऊंची
दुकाने,करमुणीकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.
0 टिप्पण्या