Ticker

6/recent/ticker-posts

मच्छिंद्रनाथांच्या पावन भुमीत माजी आ.भीमराव धोंडे यांचे गाव चलो अभियान,कार्यकर्ता मेळावा संपन्न...............पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील जगात सामर्थ्यवान देश म्हणून भारतवासीयांना अभिमान *----माजी आ.भीमराव‌ धोंडे

आष्टी (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टीतर्फे व्यापक जनसंपर्कासाठी ''गाव चलो अभियान'' सुरू आहे.त्या अनुषंगाने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई मुंडे, खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी विधानसभा मतदारसंघाचे माजी आ.भीमराव‌ धोंडे यांनी मच्छिंद्रनाथ नाथाचे दर्शन घेऊन मच्छिंद्रनाथांच्या पावणभूमीत गाव चलो अभियान हाती घेतले असून ठिकठिकाणी कार्यकर्ते मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मोदी सरकारचे प्रभावी कामे घराघरात धोंडे पोहोचवत आहेत.मोदी जगात प्रसिद्ध असून पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी व प्रितमताईं मुंडे खा. करण्यासाठी सरकारचे कामे पोहचवणे गरजेचे आहे.भारत देश मोदींच्या नेतृत्वाखालील प्रगतशील देश म्हणून १२ व्या क्रमांकावरून ५ क्रमांकावर आला आहे.३ क्रमांकावर आणण्यासाठी मोदींचा मानस आहे.लोकसभेला प्रितमताईंना साथ द्यावी मोठ्या प्रमाणावर खा. प्रितमताईंच्या नेतृत्वाखाली विकास कामे झाले आहेत असे प्रतिपादन माजी आ. भीमराव‌ धोंडे यांनी केले ते दि.२० फेब्रुवारी रोजी सावरगांव येथे " गाव चलो अभियानात " कार्यकर्ता बैठक प्रसंगी बोलत होते.त्यांनी विविध घटकांशी संवाद साधला विचारांची देवाणघेवाण होत आहे.त्यांच्या या अभियानाला नागरीकांनी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी व्यासपीठावर भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे, युवा नेते अभयराजे धोंडे,भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. साहेबराव म्हस्के, जि.प.सदस्य वर्षा माळी, अशोक साळवे,सरपंच पंढरीनाथ चंदनशिव, विष्णुपंत वायभासे, सरपंच दादासाहेब जगताप यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आ.भीमराव धोंडे यांनी पुढे बोलताना म्हणाले की,उपस्थित कार्यकर्ते,गटप्रमुख, गणप्रमुख,शक्तीकेद्र प्रमुख,बुथप्रमुख यांनी मोदी यांनी १० वर्षात विविध कल्याणकारी योजना राबविलेल्या घराघरात पोहचवा खा. प्रितमताई मुंडे यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे. त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी त्यांची कामे सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे.सरकारने पिक विमा १ रुपयात मोफत दिला जात आहे. रेल्वे आष्टीपर्यंत धावत आहे.लवकरच परळी पर्यंत धावेल,विकास कामात भारतीय जनता पार्टीने वेग घेतला आहे.मागच्या काळात कोणत्याच पक्षाने वेग घेतला नाही,अयोद्याचे भव्य दिव्य मंदीर साकारले गेले आहे.नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून लोकसभेच्या उमेदवार प्रितम मुंडे यांना निवडून द्यायचे आहे. त्यांच्याबरोबर राहिल पाहिजे मोदी जगात प्रसिद्ध आहेत.त्यांना पुन्हा पंतप्रधान करायच आहे.आज ५ व्या. क्रमांकावर आहोत. जगात ३ नं.प्रगतशील देश करायचा आहे. आपली सर्वांची छाती गर्वाने फुगेल असे सांगितले.भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अजय धोंडे म्हणाले की, कार्यकर्ता म्हणून मोदी यांनी केलेली विकास कामे सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहचवणे ज्या योजना झाल्या नवीन येणार आहेत त्यांचा जास्तीत लाभ घेतला पाहिजे पक्षाचे काम आपले काम लोकसभेपूर्वी घराघरात पोहचवा नमो अॕप,सरल अॕप डाऊनलोड करून माहिती भरायची आहे. भविष्यात १४ ते १९ कार्यकाळात भीमराव धोंडे यांनी केलेली कामे मोदी सरकारने व पंकजाताई,प्रितमताईंनी केलेली कामे पोहचवावेत असे आवाहन केले. तालुकाध्यक्ष अॕड. साहेबराव म्हस्के यांनी भीमराव धोंडे तुमच्या मुळेच विद्यार्थी शिकत आहेत.आज डॉक्टर, वकील,विविध क्षेत्रात मुले घडले आहेत. पंकजाताई,भीमराव धोंडे यांची‌ कृपा लाईट या सर्व परीसरात आली,विहीरी रस्ते,प्राथमिक गरजा भागविण्याचे काम धोंडे यांनीच केले आहे. लाईट सप्टेशन दिले आहे.मोदी सरकारने संरक्षण क्षेत्रात भक्कम योगदान दिले मोदीजींचे नेतृत्व जगाने मान्य केले.खंबीर नेतृत्व आहे.महिलांना एसटी अर्धे तिकीट झाले आहे. पीएम किसान शेतकऱ्यांना मिळणारा लाभ ६ हजारावरून १२ करण्यात आला आहे. भ्रष्टाचार मुक्त देश होत आहे.युद्धात आपले अडकलेले विद्यार्थी येईपर्यंत युद्ध मोदी साहेबांनी थांबवले,मोदी सरकारने १ रुपयात पिक विमा दिला ,शाळा,रस्ते, पाणी लाईट भीमराव धोंडे यांच्यामुळे झाले रस्ते स्वावलंबी झाले, लवकरच माजी आ. भीमराव धोंडे यांचे पुनर्वसन होणार आहे असा विश्वास व्यक्त केला. प्रस्ताविक करताना युवराज वायभासे म्हणाले की,नारी शक्ती विधेयक रोजगार मेळावे,बचत गट,उज्ज्वला गॅस,३७० कलम हटवले,राम मंदिर, मोदी आवास अशा २३२ योजना मोदी सरकारने राबविल्या याचा अभिमान आहे.याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भाजप पक्ष इलेक्शन मोडमध्ये असतो आम्हीच निवडुन येऊ,भारतीय जनता पार्टी जागतिक स्तरावर सक्रिय असणारा पक्ष आहे. तुमच्या आमच्या विचारांची बैठक आहे. माजी आ.भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली शालेय विद्यार्थी,वंचित घटकांपर्यंत माहिती पोहचावी असे आवाहन केले.अशोक साळवे, सरपंच दादासाहेब जगताप,सरपंच संजय विधाते,विष्णुपंत वायभासे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच संजयदादा विधाते, भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉ.अजयदादा धोंडे, भाजपा आष्टी तालुकाध्यक्ष ॲड. साहेबराव म्हस्के, आरपीआयचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे,जि.प.सदस्य सुरेश माळी,सरपंच पंढरीनाथ चंदनशिव, सरपंच दादासाहेब जगताप,चेअरमन चंद्रकांत म्हस्के,सरपंच संजय विधाते,संपतराव म्हस्के,अशोक माळी, रामकिसन ठोंबरे, विष्णूपंत वायभासे, भरत मगर,बाळासाहेब शेकडे,उद्धव सिरसाठ, मुरलीधर शेकडे,युवराज वायभासे,बाळासाहेब शेकडे,राधाकिसन सिरसाठ,बापु पवार,सर्व सुपर वॉरीअर्स,शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख,गण प्रमुख,बुथ समिती आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन युवराज वायभासे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या