
आष्टी तालुक्यातील जामगावचे सरपंच तथा युवानेते राधेश्याम धस यांच्या
वाढदिवसानिमित्त आष्टी येथे आज बुधवार दि.२१ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे
आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये रक्तदान शिबिर,महिलांसाठी हळदी कुंकू,होममिनिस्टर
अर्थात खेळ पैठणीचा, मोफत दंत व त्वचारोग तपासणी शिबिर,पोखरी येथे महाआरोग्य तपासणी
शिबीर,शेकापूर येथील गोशाळेला दोन दिवस पुरेल एवढा चारा अशा विविध सामाजिक उपयोगी
कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आल्याची माहिती राधेश्यामभैय्या धस मित्र मंडळाने दिली
आहे. आष्टी तालुक्यातील जामगावचे सरपंच तथा युवानेते राधेश्याम धस यांच्या
वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम घेत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात येते.यंदाही आज बुधवार दि.२१ फेब्रुवारी रोजी आष्टी शहरातील पंचायत समिती
प्रांगणात भव्य रक्तदान शिबिर सकाळी ९ ते २ या वेळेत आयोजित केले आहे.तर याचवेळी
डॉ.प्रणित जावळे व नेहा जावळे यांच्यावतीने मोफत दंत व त्वचारोग तपासणी शिबिर आष्टी
मुर्शदपुर येथील डॉ.जावळे डेंटल हेअर क्लिनिक,गीते कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात
आले आहे.शेकापूर येथील गोशाळेला दोन दिवसाचा चारा देण्यात येणार आहे.पोखरी येथे
उपसरपंच दीपक घुले यांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाबरोबरच प्रसिद्ध सिनेअभिनेते
निलेश पापत यांचा हा खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी प्रत्येक महिला भगिनींसाठी भेटवस्तूचे वाटप
करण्यात येणार असून आष्टी पंचायत समिती प्रांगणात होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांचा
लाभ घेण्याचे आवाहन राधेश्यामभैय्या धस मित्र मंडळाने केले आहे.
0 टिप्पण्या