Ticker

6/recent/ticker-posts

ना.अनिल पटील ,प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांंच्या उपस्थितीत अंमळनेर येथे सरपंच मेळवा संपन्न

आष्टी ( प्रतिनिधी) सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र तालुका अंमळनेर यांचेवतीने सरपंच,उपसरपंच व सन्माननीय तालुकास्तरीय मेळावा तसेच नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ मराठा मंगल कार्यालय अंमळनेर येथे संपन्न झाला.या मेळाव्याचे उद्घाटन मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिलदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे हे होते.तर माजी आ.शिरीषदादा चौधरी,राज्य कोर कमिटी सदस्य आबासाहेब सोनवणे,राज्य कमिटीचे प्रमुख जे.डी.टेमगिरे, नाशिक विभागीय अध्यक्ष राजमल भागवत,उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्षा सौ. सुषमाताई देसले पाटील,जिल्हाध्यक्ष बाळूभाऊ धुमाळ,श्रीकांत पाटील,जिल्हा समन्वयक सुरेशतात्या पाटील, कार्याध्यक्ष एनसीपी अंमळनेर,नितीन पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती हिरालाल पाटील संचालक बाजार समिती यांंच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सरपंच यांचे अधिकार अत्यंत मौलिक व महत्त्वाचे आहेत. खऱ्या अर्थाने ग्रामविकास चक्र सरपंच यांचेच हातात असते असे नमूद केले. सरपंच परिषदेच्या माध्यमातून सर्व सरपंच,उपसरपंच, महिला सदस्यांना अधिक सक्षम करून त्यांना योग्य ती मदत पुरविण्यात येत असते. सरपंच परिषदेच्या मेळाव्याचे आयोजन विभागीय अध्यक्ष सौ. सुषमाताई देसले पाटील यांचे मार्गदर्शनात अंमळनेर तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे,जिल्हा समन्वयक चंद्रकांत पाटील, सौ.कल्याणी पाटील,महिला अध्यक्षा सौ.शितल पाटील यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले. याप्रसंगी नवीन पदाधिका-यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.या मेळाव्यास सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या