Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी करिअर घडवताना माणुसकी जपली पाहिजे - दीपक नागरगोजे ............ विद्यार्थ्यांनी आयएएस होण्याचे ध्येय ठेवावे ........... विजय गोल्हार

आष्टी (प्रतिनिधी) भास्कर अकॅडमीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवावे मात्र केवळ लौकिक शिक्षणापेक्षा आपण अगोदर माणूस बनण्याचे शिक्षण घ्यावे चांगला माणूस होण्याचे ध्येय ठेवावे असे प्रतिपादन आर्वी येथील शांतीवनचे संचालक ज्येष्ठ समाजसेवक दीपक नागरगोजे यांनी केले.तर विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर थेट भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी होण्याचेच ध्येय ठेवावे असे आवाहन समाजसेवक विजय गोल्हार यांनी केले.. आष्टी येथील " भास्कर अकॅडमी फॉर सायन्स अँड इंजीनियरिंग " या संस्थेद्वारे उच्च माध्यमिक,बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा, फेअरवेल समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आष्टी येथील आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ.विलास सोनवणे होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी मनोज धस,युनिक अकॅडमी बीडचे हर्षल केकाण, गणेश विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेशसिंह देसूरकर,प्रा.डॉ.सुहास गोपणे,डॉ.पुरुषोत्तम बावदानकर,युवा उद्योगपती बाबूभैय्या गर्जे, श्रीमती सीमा कांबळे,श्रीमती सुवर्णाताई गि-हे ,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे,आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण पोकळे, उपाध्यक्ष संतोष सानप,शरद रेडेकर,जावेद पठाण,राजेंद्र लाड, समीर शेख,आकाश डोंगरे हे उपस्थित होते.. पुढे बोलताना दीपक नागरगोजे म्हणाले की, सध्याचे युगे स्पर्धेचे आणि उच्चतंत्रज्ञानाचे आहे हे शिक्षण घेत असताना मध्यंतरी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागत होते ही ऑनलाईन शिक्षण पद्धतीने शिक्षण दिले गेले मात्र विद्यार्थ्यांच्या मनावर परिणामकारक शिक्षण पद्धती ही ऑनलाइन पेक्षा प्रत्यक्ष शिक्षण पद्धती हे प्रभावी आहे मध्यंतरीच्या काळामध्ये ऑनलाइन पद्धतीच्या शिक्षणामुळे अनेक समस्या उभ्या राहत आहेत बालपणी बालक रडत असताना बालकाची आई त्याच्या हातात मोबाईल देत आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले की आपण फार सुदैवी आहात कारण आष्टी सारख्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या सुविधा भास्कर अकॅडमी व्दारे मिळत असल्यामुळे इतर राज्यात जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा येथील शेतकऱ्यांच्या मुलांना त्यापेक्षाही दर्जेदार आणि अधिक चांगले परिणाम मिळणारे शिक्षण मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.. ते पुढे म्हणाले.. विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीच्या विषयात करिअर करावे त्यात प्राविण्य मिळवावे आणि आपले जीवन उज्वल व्हावे यासाठी प्रयत्न करावेत असे सांगत ते म्हणाले की आई-वडिलांचे कष्ट लक्षात घेऊन मुलांनी अभ्यास करावा त्यांच्या कष्टांचे चीज करावे.. मात्र करिअर उज्वल करत असतानाच आपण अगोदर माणूस आहोत हे विसरता कामा नये आपल्यातला माणूस चांगला असेल तर आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो याचे भान ठेवावे असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी त्यांनी शांतीवन येथील अनाथ बालकांचे जीवन प्रत्यक्ष पाहण्यासाठी यावे असे आवाहन सर्व उपस्थित मान्यवरांना आणि विद्यार्थ्यांना केले.यावेळी बोलताना समाजसेवक विजय गोल्हार यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला उद्देशच विशाल स्वरूपाचा ठेवावा ध्येय जर मोठे असेल तर यश प्राप्ती सोपी होत असते शिक्षण घेत असतानाच आपण कोणत्या क्षेत्रात यशस्वी होऊ याचा अभ्यास करावा आणि सर्वसामान्य नोकरी करण्यापेक्षा आपण उच्चपदस्थ अधिकारी म्हणजेच भारतीय प्रशासन सेवा उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारी व्हावे यासाठी परिश्रम घेऊन अभ्यास करावा आई-वडिलांची जाणीव ठेवून अभ्यास करावा असे आवाहन केले.. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.विलासराव सोनवणे म्हणाले की, भास्कर अकॅडमी सायन्स अँड इंजीनियरिंग या संस्थेचे संचालक यांनी उत्कृष्ट कोचिंग द्वारे विद्यार्थ्यांना घडवले असून या संस्थेतून अनेक विद्यार्थी आज उच्चपदस्थ झाले आहेत या अकॅडमीचे संचालकांनी विद्यार्थ्यांच्या या शुभेच्छा समारंभासाठी आष्टीतील विविध क्षेत्रांमधील यश मिळवलेल्या मान्यवरांना आमंत्रित केले असून ते सर्व आपापल्या क्षेत्रातील उच्च यश प्राप्त केलेले असल्यामुळे या मान्यवरांचा आदर्श आपल्या अकॅडमीतील विद्यार्थी घेतील अशी आशा व्यक्त केली. यावेळी बोलताना शिक्षण विस्तार अधिकारी मनोरंजन धस म्हणाले की, बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगारांचा जिल्हा आणि आष्टी तालुका हा दहावी बारावीच्या परीक्षा केंद्रांमधील कॉप्या पुरवण्याबद्दल प्रसिद्ध आहे अशी ओळख असलेला झाला आहे.. मात्र हा कलंक आपल्याला पुसण्याची गरज असून आज आष्टी तालुक्यातून एमबीबीएस हे वैद्यकीय शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी तयार होत असून कोचिंग क्लासेस मधील दर्जेदार शिक्षणातून होत असल्याचे दिसून येत आहे असे सांगितले.या कार्यक्रमांमध्ये युनिक अकॅडमीचे संचालक हर्षल केकाण, जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, उत्तम बोडखे श्रीमती सीमा कांबळे श्रीमती सुवर्ण गि-हे,कानिफनाथ काकडे यांची समायोजित भाषणे झाली तर कवी राजेंद्र लाड यांनी बहारदार कविता सादर केली.याच समारंभामध्ये शांतीवन येथील अनाथ बालकांसाठी विजय गोल्हार आणि डॉ.विलासराव सोनवणे यांनी प्रत्येकी ११ हजार रुपयांचा धनादेश शांतिवनचे संचालक दीपक नागरगोजे यांच्याकडे सुपूर्द केला.यावेळी ही रक्कम अनाथ नवजात बालकांसाठी मातेप्रमाणे असलेले दूध उपलब्ध करण्यासाठी या रकमेचा उपयोग करण्यात येईल असे दीपक नागरगोजे यांनी सांगितले.या भास्कर अकॅडमी मधील विद्यार्थिनी शकुंतला पंढरीनाथ गर्जे हिने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी आयोजित नमो चषक मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावल्याबद्दल अकॅडमीतर्फे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुरुवातीला प्रास्ताविक करताना भास्कर अकॅडमीच्या संचलिका मीरा शिवाजी राख यांनी भास्कर अकॅडमीमधील शिक्षण पद्धती आणि यशस्वी विद्यार्थ्यांबद्दलची माहिती दिली.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विजय राजपुरे यांनी केले तर आभार सौ.मिराबाई राख यांनी मानले.​कावरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या