
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मासुटिकल
सायन्स अँड रिसर्च आष्टी (डी.बी.एम.फार्मसी) येथील विद्यार्थ्यांनी नुकतीच औषध
निर्माण करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांना भेटी देऊन औषधी निर्मिती कशा पद्धतीने केली
जाते. याबद्दल सखोल माहिती घेतली.विद्यार्थ्यांनी फार्मसी शिक्षण घेत असताना
त्यांना फार्मसी विषयांमधील असणाऱ्या वेगवेगळ्या विषयाची सखोल माहिती घेण्यासाठी,
कशा पद्धतीने औषध निर्माण कंपनीमध्ये वेगवेगळे प्रकारचे औषध तयार केले जातात.
कोणकोणत्या प्रक्रिया वापरल्या जातात त्या ठिकाणी सर्व रचना कसे असतात कशा पद्धतीने
काळजी घेतली जाते औषध निर्माण करण्यासाठी वापरण्यात जाणारे सर्व प्रकारचे साहित्य
वस्तू कशा प्रकारचे असतात याची सर्व माहिती मिळण्यासाठी या कॉलेजमधून दरवर्षी
विद्यार्थ्यांसाठी औषध निर्माण कंपनींना भेट देण्याचे आयोजन केले जाते. यावर्षी
कोल्हापूरमधील एसजी फायटो फार्मा प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या ठिकाणी भेट देऊन
वेगवेगळ्या आयुर्वेदिक प्रोडक्ट तसेच वेगवेगळ्या औषधी गोळ्या कशा पद्धतीने बनवल्या
जातात त्याच्या सर्व टप्पे पहिल्यापासून शेवटपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी
अभ्यासल्या याठिकाणी डॉ.बाळासाहेब गुने व त्यांच्या सर्व सहकार्याने
विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागाचे व्यवस्थित मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे
खूप खूप धन्यवाद. तसेच पणजी गोवा या ठिकाणी सानोफी अवेंटिज मल्टी नॅशनल
फार्मासुटिकल हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड पहिल्यांदा फ्रेंच या ठिकाणी सुरुवात
झाली व सर्व जगात सर्व ठिकाणी या कंपनीच्या वेगवेगळ्या ब्रांच आहेत या औषधी कंपनीने
पोलिओ,रेबीज, इनफ्लंजा,अशा प्रकारच्या वेगवेगळ्या लसीची निर्मिती केलेली आहे तसेच
अनेक प्रकारच्या रोगावर औषधाची निर्मिती केलेली आहे. या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग
विभाग प्रमुख डॉ.मनोज खरडे आणि आरएनडी प्रमुख डॉ.श्रीकृष्ण पवार व त्यांचे
सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये सुरु असलेले प्रोडक्शन विभाग त्या ठिकाणी
वेगवेगळ्या पद्धती तसेच या कंपनीची असलेली आरएनडी डिपार्टमेंट ज्या ठिकाणी औषधाचा
शोध लावला जातो तो कशा पद्धतीने लावला जातो त्यासाठी काय केले जाते कोणकोणते विभाग
असतात या सर्व विभागाची माहिती, प्रत्येक विभागातील साहित्य,मशीन्स त्यांची
माहितीअगदी सविस्तर विद्यार्थ्याला समजेल या भाषेमध्ये दिली.कंपनी पाहण्याची संधी
दिली व सविस्तर माहिती सांगितली याबद्दल या कंपनीमधील सर्व अधिकाऱ्यांचे व
सहकाऱ्यांचे प्राचार्य डॉ.सुनील कोल्हे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांना शिक्षण
घेत असताना सर्व प्रकारचे ज्ञान मिळाले पाहिजे यासाठी सतत प्रयत्नशील असणारे
संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे , डॉ. अजय धोंडे,अभय धोंडे, प्रशासन अधिकारी
डॉ.डी.बी.राऊत,शिवदास विधाते,दत्तात्रय गिलचे,माऊली बोडखे,संजय शेंडे यांचे या
भेटीसाठी मार्गदर्शन लाभले.औषधी कंपनीच्या सर्व माहिती व्यवस्थित मिळावी. या भेटीचे
सर्व नियोजन सर्व कॉलेजच्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.
0 टिप्पण्या