

आष्टी (प्रतिनिधी)
लहान मुलांना बालवयातच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग
घेण्यासाठी पालकांनी प्रोत्साहित करावे.त्यांची स्टेजवरील भीती जाण्यास मदत होते.
धाडशीपणा त्यांच्यात आला पाहिजे.स्टेजकरेज आले पाहिजे.त्यांची प्रगती होण्यास मदत
होते.गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने
धाडसीपणा निर्माण होतो असे प्रतिपादन डाॕ.अजयदादा धोंडे यांनी केले. आष्टी येथील
सियाज् प्रिस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन हा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. या
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आष्टीचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस उपस्थित होते.या
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस
डाॕ.अजयदादा धोंडे,दैनिक झुंजारनेता उपसंपादक उत्तम बोडखे,पत्रकार संघाचे अध्यक्ष
प्रवीण पोकळे, तवलवाडीचे सरपंच हिराभाऊ केरूळकर,साईनाथ उद्योग समूहाचे संचालक
युवराज ससाणे, राजे संभाजी उद्योग समूहाचे अध्यक्ष अमोलराजे शिंदे,आष्टीचे नगरसेवक
तथा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ आष्टीचे अध्यक्ष सुनील रेडेकर, दैनिक
लोकाशाचे पत्रकार संतोष सानप, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मुगगाव येथील
मुख्याध्यापिका सौ.विद्याताई चंद्रकांत ढेरे,आदर्श शिक्षिका सौ.बबीताताई बोडखे,
नांदुरच्या माजी सरपंच सौ.कमलबाई विधाते आदि उपस्थित होते. उपस्थितीत पाहुण्यांचा
सत्कार रुईनालकोल येथील पार्वती ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ.
बाळासाहेब धोंडे,माजी कृषी अधिकारी परशुराम विधाते,प्रा.डॉ.शुभम विधाते, सियाज्
प्री-स्कूलचे संचालक प्रा.इंजि. सचिन विधाते संचालिका प्रा.इंजि. प्रियंका विधाते
यांच्या हस्ते करण्यात आला.पार्वती ग्रामीण विकास प्रतिष्ठान या सामाजिक
संस्थेमार्फत विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श
पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदर्श उद्योजक म्हणून साईनाथ उद्योग समूहाचे मालक
सावता विठ्ठल ससाणे यांना जाहिर करण्यात आला.हा पुरस्कार ससाणे यांचे पुतणे युवराज
ससाणे यांनी स्विकारला.आदर्श युवा उद्योजक म्हणून राजे संभाजी उद्योग समूहाचे
अध्यक्ष अमोलराजे शिंदे यांना तर आदर्श पत्रकार म्हणून लोकाशाचे आष्टी तालुका
प्रतिनिधी संतोष सानप यांना देण्यात आला. आदर्श सामाजिक कार्य पुरस्कार नगरसेवक तथा
आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष सुनील रेडेकर,आदर्श
शैक्षणिक कार्य पुरस्कार मुगगांव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या
मुख्याध्यापिका सौ. विद्याताई चंद्रकांत ढेरे यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
अजयदादा धोंडे म्हणाले की, लहान मुलांना बालवयातच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये
सहभाग घेण्यासाठी पालकांनी प्रोत्साहित करावे.त्यांची स्टेजवरील भीती जाण्यास मदत
होते.धाडशीपणा त्यांच्यात आला पाहिजे.स्टेजकरेज आले पाहिजे.त्यांची प्रगती होण्यास
मदत होते.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष
पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस बोलताना म्हणाले की,सियाज् प्रिस्कूल शाळा
विद्यार्थ्यांना खूप लहान वयातच घडवत आहे . उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन केलेले
पाहून संचालकांचे त्यांनी कौतुक केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना
प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शाळेने
यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना मेडल प्रदान केले होते जेणेकरून विद्यार्थ्यांच्या
आत्मविश्वास वाढण्यास,प्रगती होण्यास मदत होईल.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध
गाण्यावर उस्फूर्त डान्स करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.यावेळी विद्यार्थ्यांनी
सर्वांना सामाजिक भान असावे म्हणून सेव्ह ट्री आणि सोशल मीडियाचे अपाय हा ड्रामा
सादर केला. अशा सगळ्या वेगळ्या झालेल्या कार्यक्रमाचे सर्वांनी मनापासून कौतुक
केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सियाज प्री स्कूलमधील शिक्षिका सौ. नंदिता
गायकवाड,सौ. संध्या तोडकर,सौ.सुनीता अनारसे,सौ. मनीषा सोंडगे,सौ.भाग्यश्री देशमुख,
सौ.स्वाती धोंडे,सौ.जागृती धोंडे,सौ. सुरेखा जाधव,महेश तोडकर,गणेश पवार कृष्णा देठे
यांचे सहकार्य लाभले.मुलांनी केलेला डान्स,उपलब्ध असलेला डीजे,स्क्रीन,लाईट यामुळे
प्रेक्षक भारावून गेले होते. यावेळी सूत्रसंचालन सौ. प्रियंका विधाते यांनी केले
सर्व मान्यवर, पालक, प्रेक्षकांचे आभार प्रा. इंजि.सचिन विधाते यांनी मानले.
0 टिप्पण्या