Ticker

6/recent/ticker-posts

बाबासाहेब पिसोरे यांना कृषीरत्न पुरस्कार जाहिर*

आष्टी(प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील दौलावडगांव येथील कृषिभुषण बाबासाहेब पिसोरे यांना महाराष्ट्र शासनाचा कृषीरत्न पुरस्कार नुकताच जाहिर झाला आहे.कृषी क्षेत्रातील सर्वोच्च असा डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार २०२१ केळसांगवी येथील महिला शेतकरी श्रीमती विजया गंगाधर घुले यांना जिजामाता कृषिभूषण शेतकरी २०२१ महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर झालेला आहे.राजेंद्र भाऊसाहेब सुपेकर आष्टीचे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी यांना पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे.पुरस्कार प्राप्त तीनही व्यक्तीचे कृषी क्षेत्रातील काम शेतकऱ्यांना योग्य दिशा देणारे आहे.या तिन्ही पुरस्कार प्राप्त सन्मानार्थीचे आ.सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर ,बीड जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या