
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आष्टी शहरात
यावर्षी प्रथमच भव्य दिव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प.अशोक
डोके सर यांंच्या पुढाकाराने हा कीर्तन महोत्सव होत आहे.या कीर्तन महोत्सवात
महाराष्ट्रातील नामांकीत कीर्तनकारांचे कीर्तन होत आहेत.दि.१२ ते १९ फेब्रुवारी
२०२४ या कालावधीत कीर्तन महोत्सव होत आहे. ह.भ.प.शिवचरित्रकार मोहन महाराज शेलार
(बीड), साध्वी ह.भ.प. सोनालीदिदि करपे (चकलंबा),शिवचरित्रकार प्रा.डाॕ.गजानन महाराज
वाव्हळ (पुणे),विश्वविक्रम प्राप्त वैराग्यमूर्ती ह.भ.प. रामकृष्ण रंधवेबापू,
शिवचरित्रकार ह.भ.प. डाॕ.गजानन महाराज शास्री (जालना), अ.भा.वारकरी मंडळाचे
राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांचे हरिकीर्तन झाले. आज रविवार
दि.१८ फेब्रुवारी रोजी आळंदी येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.सुदाम महाराज
पानेगावकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. शिवजयंतीदिनी दि.१९ फेब्रुवारी रोजी
सकाळी गहिनीनाथगडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्री गहिनीनाथगडकर यांचे
काल्याचे कीर्तन होणार आहे. या काल्याचे कीर्तननंतर महाप्रसादाची महापंगत होणार
आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे या ऐतिहासिक आणि धार्मिक कार्यक्रमास मोठ्या
संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक ह.भ.प. अशोक डोके सर, दत्तनगर,सावतानगर,
संभाजीनगर, विनायकनगर,' माऊलीनगर आणि आष्टी शहरातील शिवभक्त, नागरिकांनी केले आहे.
0 टिप्पण्या