Ticker

6/recent/ticker-posts

पैशाचा माज नको; जिथे नम्रता तिथे लक्ष्मी नांदते .......... ह.भ.प.इंदुरीकर महाराज ............... आष्टी येथे शिवजयंतीनिमित्त किर्तन सेवेला भावीक भक्तांची अलोट गर्दी

उत्तम बोडखे , आष्टी --------------------------- अंगातील ताकत,खिशातील पैसा जपुन वापरा..दोन मिनीटाचा राग तुम्हांला आयुष्यातुन संपवु शकतो आणि दोन मिनीटाचा राग तुम्हांला देव बनवु शकतो.राग हा चांगला नसतो.राग हा अडचणी व संकटात टाकतो.म्हणुन क्रोधला आवरा.अनाधी कालापासुन संत,महात्मे जिवंत असताना त्यांना समाजाकडुन अपमान मिळतो. त्यांचा मोठेपणा स्विकारला जात नाही ते गेल्यावर त्यांना महत्व येत असते.गरीब असेपर्यत आपल्याला दुश्मन नसतात, त्याला बरे दिवस आले की शञुंची संख्या वाढते. सध्या वादग्रस्त चर्चेने माझे मन व्यथीत झाले आहे.मला प्रतिक्रिया देण्याची ईच्छाच राहिली नाही.चांगले काम करणाऱ्यांना नेहमी समाजाकडुन ञास होतो.हा आपण सध्या अनुभव घेत आहोत. वाईट विचारांची माणसे चांगले काम करणाऱ्यांना ञास देणारच,काय झाले माहित नाही माञ सध्या माझ्याबाबत वाईट चर्चा सुरु असते.उठलो की,दररोज नवे लफडे नव्या प्रश्नाला तोंड द्यावे लागते आपण कंटाळलो बुवा.. आपला माणुस आपल्या माणसांन खरे सांगतोय पण त्याचा त्रास सहन करावा लागतोय...पैसा सांभाळायला नम्रता लागते;ज्याठिकाणी नम्रता असते तिथेच लक्ष्मी नांदते; पैशाचा माज आला की लक्ष्मी निघून जाते असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराजांनी केले. तर स्वताःचे राज्य स्वताः निर्माण करणारे सृष्टीतील छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राजे आहेत.ते स्वताः प्रशासक, ते स्वताः निर्माते तर होतेच शिवाय ग्रामविकासाचे खातेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरु केलेले आहे.छत्रपती यांच्या राज्याला तोडच होऊ शकत नाही तसे राज्य होऊच शकत नाही. आजचे सरकार म्हणजे आंधळं दळतय....पीठ खातयं सारखं आहे...असे मत समाजप्रबोधनकार ह.भ.प.इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केले. आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी चौक सार्वजनिक शिवजयंती समितीतर्फे आयोजित कीर्तन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर, नगरसेवक सुनिल रेडेकर, संजयशेठ मेहेर,बलभीम सुंबरे,शादुल्ला बेग (टाटा),ज्योतीबा रेडेकर, पत्रकार उत्तम बोडखे, विक्रम पोकळे ,विजय बोगावत,सचिन रानडे, प्रविण पोकळे, नगरसेवक,पोकळे आदि राजकीय,सामाजिक, धार्मिक,व्यापार क्षेत्रातील मान्यवर,नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना ह.भ.प.इंदुरीकर महाराज म्हणाले की,माणसांनी माणसांसारखे वागणे म्हणजे धर्म आहे.स्वार्थ व धर्म एकत्र राहुच शकत नाहीत.विठ्ठल हा पंढरपूरचा पाटील आहे. तो आपला बाप आहे. रुक्मिणी आपली आई आहे.पुंडलीक हा आपला भाऊ आहे तर चंद्रभागा आपली बहिण आहे. आपल्या शरीरात मन हे पाटील आहे.ईर्षा ही प्रियेसी आहे.मन आणि ईर्षा या दोघांचे प्रेम झाले.मन आहे नपुसक आहे.ईच्छा ही तरुण आहे.ती प्रियकर मन हा नपुसक असल्याचे सांगते. ईच्छेची मैत्रिण मायाला सांगते.ईर्षा ही आपले दुःख माया नावाच्या मैत्रीणीला सांगते.पण मायाला नवरा नाही.तीला काय दुःख कळणार ? मी,माझं, तु,तुझं हे माया करत असते.मीपणा वाढला की नाश होतो.हे सर्व माझे आहे.हा भ्रम आहे.भ्रमात जगुच नका. यापुढे लग्न वन डे करा..माना पानसाठी शेतकरी कर्ज बाजारी होत आहेत.ज्ञानदृष्टीने देवाकडे पाहायचे असते.काया,वाचा व मनाने भक्ती केली तर देवाशी एकरुप होता येते.प्रत्येक माणसाने अतरंग जाणले तर दोष वाटत नाही.बाह्यरंगाने दोषच दिसतात. सर्वसामान्य माणुस बाह्यरंगातच जगत असतो त्यामुळे त्याला ईतरात नेहमीच दोष, चुका दिसतात असे सांगत इंदुरीकर यांनी त्यांच्या मनात सध्या सुरु असलेल्या घुसमटीला वाट करुन दिली.धर्म,देश,संप्रदाय ,संस्कृती हे गरीबच टिकवुन ठेवतात.अन्नदान श्रीमंत लोक करीत नाहीत तर अन्नदान गरीबाच करतात,उदारता व दातृत्व गरीबांकडुन शिकावे.गायी,आई,बैल,देश व संस्कृती गरीब माणुस सांभाळतात. देशाच्या सैन्यदलात श्रीमंतांची मुले नसतात तर आमच्या मोलमजुरी, शेतकरी,शेतमजुरी व कष्टकरी लोकांची मुले असतात.माणसाने पाणी,विज,ताकत व पैसा जपुन वापरला पाहिजे. नम्रता धरुन गप्प राहा, अडचणीच्या काळात मौन ठेवले की, आलेल्या संकटावर उत्तर मिळते. प्रत्येकाला सरस्वती,अमृत व परिस हवे असते माञ ते मिळत नाही. माणुस फक्त भजनाने सुखी,आनंदी होत असतो.जीवनात मान,अपमान येतो जातो.त्याची चिंता करायची नाही. संताजवळ गाठ नसते,कोणी निंदा अथवा वंदा हरिनामाचा आमचा धंदा या विचाराने संत जगत असतात. साधुरक्षण,धर्माचे रक्षण व दुष्टाच्या नाशासाठी कृष्णाने अवतार घेतला. अहंकारी माणसाला ज्ञान प्राप्त होत नाही.अहंकारी माणुस देवाला आवडत नाही.ज्ञानी माणसाला गर्व होतो आणि गर्वाने विनाशच होतो. लिनता व नम्रता हेच माणसाला तारतात.सध्याच्या युगामध्ये जेव्हा संपत्ती येते तेव्हा दया नसते,पैसा जास्त झाला की प्रेम कमी होते.जिव्हाळा कमी होतो.आपुलकी नाहीशी होते आणि मनुष्यामध्ये घमेंड निर्माण होते मात्र संपत्तीला दयेची जोड मिळाल्यास संपत्ती आणि दया एकत्र आल्यास माणूस देव झाल्याशिवाय राहणार नाही.पुढे बोलताना ह.भ.प.निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराज म्हणाले की,देव आहे असे म्हणतात त्यांनी देखील देव पाहिलेला नाही आणि जे देव नाही म्हणतात त्यांचा प्रश्न निर्माण होत नाही.देव पाहता येत नाही.देव मोजता येत नाही अध्यात्मिक गुरूंनी अनेक वर्षांच्या प्रयत्नांनी देखील देव पाहिल्याचे म्हटलेले नाही मात्र दुधाचे लोण्यात रूपांतर होते,लाकडाचे अग्नीमध्ये रूपांतर होते,उसामध्ये साखरेची निर्मिती होते.ही प्रक्रिया मानवी नजरेला दिसत नाही परंतु प्रक्रिया मात्र नक्की होते तसेच देव दिसत नाही पण अस्तित्वात आहे आणि खरोखरच देव पाहायचा असेल तर संतांना शरण जावे लागेल असे सांगून सद्यस्थितीतील सामाजिक परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले की,आज २० वर्षाच्या मुलाचे लिव्हर दारू पिऊन खराब होत आहे.२५ वर्षाच्या मुलाला डायलिसिस करावे लागत आहे. *परिस्थिती का निर्माण झाली ?* ------------------------- याचा गांभीर्याने विचार करा असे कळकळीचे आवाहन करून ते म्हणाले की,दारूमुळे समाजाचा विनाश होत चाललेला आहे.याचा विचार करावा कोणीतरी खरे सांगावे लागेल,खरे बोलले नाही तर धर्म टिकणार नाही असा इशारा देत ते म्हणाले की,शेतकरी हा एकमेव घटक असा आहे की, त्याचा बाप वृद्धाश्रमात गेलेला नाही.आजही ग्रामीण भागामध्ये सुनेचा आणि सासऱ्याचं पटत नसलं तरी सून शिव्या देऊन का होईना परंतु त्याला भाकरी देत आहे.सासरा देखील म्हणतो की,सून थोडी रागीट आहे पण भाकरी मिळत असल्याने मी समाधानी आहे असे सांगत असतो.माणसाने तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात त्यातील पहिली गोष्ट म्हणजे अंगातली ताकद,दुसरी खिशातले पैसे आणि तिसरी तुमच्या जवळ असलेल्या वेळ वाया घालू नका.लक्ष्मी जपून वापरा कारण हीच लक्ष्मी एकाच दिवसात रंकाचा राव करते आणि रावाचा रंक करते. *पैसा सांभाळायला नम्रता लागते* ------------------------------- ज्या ठिकाणी नम्रता असते तिथेच लक्ष्मी नांदत असते माज आला की,लक्ष्मी निघून गेलीच समजा, लक्ष्मीचा माज केला की,तुमचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. आपण फार चांगले आहोत समाजात आपल्याला फार मान आहे असे अजिबात समजू नका कारण तुम्ही सीझन पुरते आहात तुमचा केवळ वापर होत असतो काही लोक बापाला उचलून आपटतात तर तुमची काय गत आहे. तुम्ही म्हणता माझ्यावर लोकांचे फार प्रेम आहे.लोक आपल्याला फार मानतात परंतु हे मानत बिनत नसतात. हे केवळ तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतात आणि तुमच्या पाठीमागे तुमची टिंगल करत असतात याचे भान ठेवा असे सांगीतले. समाजातील दारू पिण्याचे व्यसन कमी झाले पाहिजे कारण तरुणपणी अकाली मरण आल्यानंतर आई-बाबांनी आणि पत्नीने मुलांनी कशासाठी जगायचे ? असा प्रश्न निर्माण होऊन यातून फार मोठी सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे लोकांनी आपली ताकद चांगल्या कामाला वापरावी गाईची,काळी आई असलेल्या जमिनीची आणि घरातील आईची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे असे सांगून सामाजिक स्थिती अशी आहे. *शत्रू आपलेच असतात घरातले --------------------------- भावकीतले असतात आणि गावातले असतात.ते जिवंतपणे जगू देत नाहीत आणि मेल्यानंतर त्यांच्याशिवाय जाता येत नाही अशी विदारक परिस्थिती असल्यामुळे चांगल्या कामाला वेळ द्या चांगल्या कामात पैसा खर्च करा. अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे,
ज्ञानापेक्षा नाम श्रेष्ठ आहे,नामापेक्षा देवाचे ध्यान श्रेष्ठ आहे नामस्मरणामध्ये फार मोठी ताकद आहे असेही समाजप्रबोधनकार ह.भ.प.इंदुरीकर महाराज यांनी शेवटी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या