Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत आदेश दळवी व श्रेयशी भोसलेचे सुयश

*
डॉ.होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत आदेश दळवी व श्रेयशी भोसलेचे सुयश * आष्टी (प्रतिनिधी) डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये आष्टी येथील वसुंधरा विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.आदेश आदिनाथ दळवी,श्रेयशी युवराज भोसले निवड झाली आहे. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन मुलांना विज्ञान विषयात चौकस बनविणारी परीक्षा म्हणून डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेकडे पाहिले जाते.ही परीक्षा मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन तर्फे इयत्ता ६ वी व इयत्ता ९ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते.महाराष्ट्र पातळीवर या परीक्षेला खूप महत्त्व असून राज्यातील सर्व नामांकित शाळा या परीक्षेला प्रविष्ट होत असतात. ही परीक्षा लेखी-प्रात्यक्षिक-प्रकल्प-तोंडी या पातळीवर होत असते. अंतिम गुणवत्ताधारक विद्यार्थ्यास सन्मानपूर्वक शिष्यवृत्ती दिली जाते. या परीक्षेत आपले वसुंधरा प्राथमिक विद्यालयातील इयत्ता सहावीतील ६२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यापैकी २६ विद्यार्थ्यांची निवड प्रात्यक्षिक परीक्षेसाठी करण्यात झाली होती. प्रात्यक्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून आदेश दळवी, श्रेयशी भोसले.या विद्यार्थ्यांची प्रकल्प पातळीसाठी निवड झालेली आहे या मुलांना प्रकल्प पूर्ण झाले तर मुलाखत द्यावी लागणार आहे. वसुंधरा विद्यालय सुरू झाल्यापासून या परीक्षेत आजपर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.श्रीमती कुमकर यांनी या मुलांची खूप चांगली तयारी करून घेतली याबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थाप्रमुख मनोज धस,मुख्याध्यापिका (प्राथमिक ) श्रीमती सीमा बोंदार्डे, मुख्याध्यापक (माध्यमिक ) मंगेश भालेराव यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या