आष्टी ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर -
बीड रेल्वेचा दुसरा टप्पा कार्यान्वित होत असून आष्टी अंमळनेर या डेमो रेल्वेचे
लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे होणार
आहे. याबाबत अधिक माहिती अशी की गेली अनेक वर्ष बीड जिल्ह्यातील जनतेचा जिव्हाळ्या
जिव्हाळ्याचा विषय असलेला रेल्वे प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला असून मागच्या वर्षी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अहमदनगर ते आष्टी या मार्गावर धावणाऱ्या
रेल्वेचे उद्घाटन झाले होते . आता याचा पुढील टप्पा आष्टी ते अंमळनेर असा असणार
आहे.या ३५ किलोमीटर रेल्वे मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दि.२८
फेब्रुवारी सायंकाळी ४ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उद्घाटन करणार आहेत. अंमळनेर
रेल्वे स्थानकावर होणाऱ्या कार्यक्रमास खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांची उपस्थिती
असणार आहे.
0 टिप्पण्या