Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीत होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांची आलोट गर्दी ............... उषा केरुळकर,नेहा हंबर्डे,सीमा जानापुरे यांनी पटकावल्या पैठण्या व सोन्याच्या नथी,.

आष्टी (प्रतिनिधी) जामगावचे सरपंच युवानेते राधेश्याम धस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथे बुधवारी पंचायत समितीच्या प्रांगणात महिलांसाठी हळदी कुंकू तसेच न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या विविध खेळांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक उषा केरुळकर, द्वितीय क्रमांक नेहा हंबर्डे तर तृतिय क्रमांक सीमा जानापुरे यांनी पटकावला.प्रामुख्याने मनोरंजन व प्रश्नमंजुषा व विविध उपक्रमास महिला वर्गांची अलोट गर्दी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला.राधेशाम धस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महिला भगिनींसाठी खास ‘खेळ पैठणीचा खेळ मनोरंजनाचा’ सिने अभिनेते निलेश पापत यांच्या न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी तळ्यात मळ्यात, उखाणे,फुगा फोडणे, फॅशन शो या सह आदी स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला.अभूतपूर्व उत्साही वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त आयोजित केल्याबद्दल हजारोच्या संख्येने आलेल्या महिलांनी विशेष: राधेशाम धस यांचे विशेष आभार मानले.आपल्या भावाकडे माहेरी आल्याचे भावनिक व सह्दयी बोलून दाखवत होम मिनिस्टर कार्यक्रमात सर्व महिलांनी सहभाग नोंदविला. *गोशाळेला चारा तर १२१ जणांनी केले रक्तदान* ------------------------------ राधेशाम धस यांच्या वाढदिवसानिमित्त शेकापुर येथील गोशाळेला तीन टन चारा देण्यात आला तर १२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या