*

शब्द- अक्षरांच्या ज्ञानसागरातील हसतमुख जोडी !*
-------------------------------
स्त्री- पुरुष समतेची सनद म्हणजे भारतीय राज्यघटना आहे. शिक्षणाला ज्ञानापेक्षा
अर्थाजन म्हणून पाहणे दुर्दैवी आहे.संतांनी राज्याला भक्तीचा मार्ग दाखवला तसा
गुरुजनांनी समाज व्यवस्थेला ज्ञानाचा मंत्र आणि दिशा दिली. याच ज्ञान मंदिराच्या
माध्यमातून गेल्या अनेक दशके सातत्याने स्वतःला वाहून घेत सेवा कर्तव्य जपणारे
बोडखे कुटुंबीय सर्वांसाठी प्रेरणास्थान झाले आहेत.बीड जिल्ह्याच्या आष्टी
तालुक्यातील छोट्याशा खेड्यातून उत्तम बोडखे वयाच्या २० व्या.वर्षी महाविद्यालयीन
शिक्षण घेत असतानाच वृत्तपत्र क्षेत्रात लेखणी सुरु केली.आज त्यांच्या पत्रकारिता
क्षेत्राला ३६ वर्षे पूर्ण झाले तर त्यांच्या विवाहाचाही आज ३३ वा.योगायोगाने
वाढदिवस आहे.हॅपी ऍनिव्हर्सरीच्या माध्यमातून पत्रकार उत्तम बोडखे आणि त्यांच्या
सुविद्य पत्नी आदर्श शिक्षिका सौ.बबीताताई बोडखे यांना आज दिवसभर विविध क्षेत्रातील
मान्यवरांकडून शुभेच्छांचे संदेश येत राहिले अस्खलित शब्दांचा प्रतिभाशाली अविष्कार
असलेले उत्तम बोडखे परखड वाणी, अध्यात्म चिंतन, परमार्थाची गोडी,जीवन विषयक
तत्वज्ञान आणि आवडीचा छंद जोपासल्यामुळे चीर तरुण दिसतात. लेखणीला समानता देणारे
उत्तम बोडके आणि बबीता ताई बोडखे बोडखके भक्ती अध्यात्माचा अलंकार मानतात. प्रपंचाचे दोष
वारीतून नाहीसे होतात म्हणून त्यांनी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे संत वामनभाऊ
महाराज यांचे आशीर्वाद सातत्याने घेतले. जीवनाचे साधन आणि साध्य ज्ञानोबा तुकोबांचे
भजन आहे हे लक्षात घेऊन त्यांनी कर्तव्य भावना जोपासली आहे.आज या हसतमुख जोडीच्या
लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने साहित्य क्षेत्रातील मंडळीच्या वतीने प्रातिनिधिकक
स्वरूपात खूप खूप शुभेच्छा..! *
--
" प्रा.बिभिषण चाटे (बीड).* ******************
0 टिप्पण्या