Ticker

6/recent/ticker-posts

जयभवानी विद्यालयाचे ९ विद्यार्थी एन.एम.एम.एस उत्तीर्ण*

आष्टी (प्रतिनिधी) भारत सरकारच्यावतीने राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी इयत्ता आठवीचे विद्यार्थी परीक्षेस बसतात.ज्या पालकांचे उत्पन्न १लाख ५० हजार रु.पेक्षा कमी आहे अशा पालकांच्या पाल्यांना या परीक्षेस बसता येते.यावर्षी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जळगांव येथीला जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ९ विद्यार्थ्यांनी एन.एम.एम.एस. या राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. विद्यालयातील‌ ४३ विद्यार्थी परिक्षेस बसले होते.त्यापैकी ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.या विद्यार्थ्यांना १२ वी पर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे.विद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांचे सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.डिसेंबर -२०२३ मध्ये‎ झालेल्या '' राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना '' परीक्षेत जळगांव येथील जयभवानी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश‎ मिळवले आहे.ही परीक्षा २००७- २००८ पासून मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार,नवी दिल्ली यांच्यामार्फत राबविली जाते.या परीक्षेत विद्यालयातील पवार सोहम महादेव,घुले रोहन कैलास,पांडुळे सार्थक विठ्ठल,मुटकुळे साक्षी महादेव,दिघे श्वेता संदीप,राऊत अनुष्का संतोष,जगताप प्रगती अंकुश,ढवळे अनुजा नारायण,चांगुणे वैभव संतोष गुणवत्ता यादीत आपले स्थान पटकावले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे, डॉ.अजयदादा धोंडे, युवा नेते अभयराजे धोंडे, प्रशासन अधिकारी डॉ.डी.बी.राऊत, शिवदास विधाते,दत्तात्रय गिलचे,संजय शेंडे, माऊली बोडखे, मुख्याध्यापक भीमराव आहेर,शिक्षक एड.डी. राऊत,एल.एम.मोहळकर,एन.आर.चांगुणे,जी.बी घुले,बी.डी खराडे,एम. एस.निमोणकर,एस.एस.बोडखे,श्रीमती आशा रासकर,श्रीमती विमल बोरुडे,ए.एन.पवळ,पवन विधाते,राकेश बोडखे, एच.एस.अनारसे,एल टी विधाते,तात्या आहेर, किशोर वाल्हेकर सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या