Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे भगवान महाविद्यालयास उत्कृष्ट प्राचार्य व उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळल्याबद्दल माजी आ.भीमराव धोंडे यांंच्याकडुन गौरव

आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या 'करिअर कट्टा' या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धा २०२३- २०२४ चा निकाल २६ जानेवारी रोजी घोषित करण्यात आला.यामध्ये आष्टी येथील भगवान महाविद्यालयाने उत्कृष्ट जिल्हास्तरीय (बीड) प्राचार्य व उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय हे दोन पुरस्कार पटकावले. 'युवकांचा सर्वांगीण विकास' हे ब्रीदवाक्य घेऊन मागील दोन वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्यावतीने महाविद्यालय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या 'करियर कट्टा' या उपक्रमांतर्गत 'स्पर्धा परीक्षा व उद्योजकता' याविषयी अनुभवी व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना करण्यात येते. महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, यासाठी ज्या महाविद्यालयाने विशेष प्रयत्न केले. अशा महाविद्यालयास पुरस्कार प्रदान करण्यात येतात.यावर्षीच्या पुरस्कारामध्ये भगवान महाविद्यालयाच्या 'करिअर कट्टा' या विभागाने विशेष प्रयत्न केले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांनी विशेष लक्ष घालून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ पोहोचवण्यासाठी या विभागाचे महाविद्यालयातील समन्वयक प्रोफेसर शिवाजी पवार व डॉ.महमद अली शेख यांना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले.हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ यांचा शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी भीमराव धोंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.त्याचबरोबर संस्थेचे सहसचिव तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डाॅ.अजयदादा धोंडे, पत्रकार उत्तम बोडखे, प्राचार्य डाॅ.उमाशंकर बनाळे,बाजीराव वाल्हेकर,बाबू कदम, उपप्राचार्य सुनील भवर व करिअर कट्टाचे समन्वयक प्रोफेसर शिवाजी पवार यांनी अभिनंदन केले व सत्कार केला आणि भगवान महाविद्यालयाच्या भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या