आष्टी (प्रतिनिधी )
दि.२ ते ८ जानेवारी या कालावधीमध्ये


आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत " पोलीस उन्नती दिन सप्ताह " अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस आणि त्यांचे सहकारी यांच्या या स्तुत्य उपक्रमाविषयी नागरिक कौतुक करत आहेत. याविषयीचे अधिकचे वृत्त असे की,
दि.२ ते ८ जानेवारी या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र पोलीस उन्नती दिन साजरा केला जातो त्यानुसार
आष्टी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक श्री संतोष खेतमाळस,सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख,भाऊसाहेब गोसावी,पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे,श्रीकृष्ण शिंदे,
नामदेव धनवडे,आजिनाथ काकडे यांचे सह सर्व कर्मचाऱ्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक आष्टी आणि कडा येथील विविध शाळा महाविद्यालयांमधील सुमारे १५०० विद्यार्थी, विद्यार्थिनींना आष्टी पोलीस स्टेशन आणि कडा येथील पोलीस दूरक्षेत्र कार्यालय अंतर्गत कामकाजाची माहिती पोलीस विभागात मध्ये वापरण्यात येणारी शस्त्रास्त्रे याविषयीची माहिती महिला सुरक्षा विषयक कायदे युवकांना पोलीस भरती विषयीची सखोल माहिती देण्यात आली.सर्वात महत्त्वाचा सामाजिक बांधिलकी राष्ट्रीय एकात्मते विषयीचा सामाजिक संदेश येणारा उपक्रम म्हणजे" सर्वात श्रेष्ठ दान " असलेले रक्तदान शिबिर आयोजित करून त्या ठिकाणी परिसरातील १४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरासाठी पोलीस मित्र संघटनेने परिश्रम घेतले अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवण्यात आले आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत प्रथमच अशा प्रकारचा भव्य विविध उपक्रमाद्वारे पोलीस उन्नती दिन साजरा करण्यात आल्यामुळे पोलीस आणि जनता यांचा अतिशय उत्तम असा सुसंवाद दिसून आला याचबरोबर दि.६ जानेवारी या दर्पण दिनी तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान पोलीस स्टेशन येथे करण्यात आला आणि दि.८ जानेवारी रोजी या पोलीस उन्नती दिन सप्ताहाचा समारोप आष्टी येथील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पोलीस बँड पथकाच्यावतीने विविध प्रकारच्या.धून आणि समरगीते,स्फूर्तिदायक गीतांचे वादन करून या उपक्रमाची सांगता करण्यात आली.या स्तुत्य उपक्रमा बद्दल पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांविषयी जनतेमध्ये कौतुक होत आहे.
चौकट
--------
पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,अप्पर पोलीस अधीक्षक सचीन पांडकर,उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस वर्धापन दिन सप्ताह साजरा करण्यात आला यानिमित्त आष्टीकर नागरिक विद्यार्थिनी विद्यार्थी यांचेशी सुसंवाद करता आला पोलीसां विषयी अकारण असलेली भीती कमी व्हावी आणि जास्तीत जास्त नागरिकांनी जागरूकपणे पोलीस स्टेशन मधील चालणाऱ्या कामकाजाकडे पहावे असा उद्देश होता तो पूर्ण झाला आहे.
- संतोष खेतमाळस
(पोलीस निरीक्षक
पो.स्टे.आष्टी)
0 टिप्पण्या