
आष्टी (प्रतिनिधी)
देवदैठण येथील मूळ रहिवासी असलेले जामखेड येथे पोलीस सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेऊन उद्योजकतेमध्ये यशस्वी झालेले संजय रंगनाथ हजारे यांचे चिरंजीव अमेय संजय हजारे यांनी नुकत्याच झालेल्या सी.ए. चार्टर्ड अकाउंटंट अर्थात(सनदी लेखापाल)या परीक्षेत उत्तीर्ण होऊन उत्तुंग भरारी घेतली आहे.
नुकत्याच झालेल्या चार्टड अकाउंट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.दि.९ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या या निकालामध्ये अमेय संजय हजारे याने २१९ गुण घेऊन सी.ए.चार्टर्ड अकाउंटंट अर्थात सनदी लेखापाल ही पदवी प्राप्त केली आहे.अमेय संजय हजारे यांचे प्राथमिक शिक्षण खेमानंद इंग्लिश स्कूल जामखेड माध्यमिक शिक्षण आठरे पाटील इंग्लिश स्कूल अहमदनगर आणि पदवीपर्यंतचे शिक्षण मॉडेल कॉलेज पुणे या ठिकाणी झाले संजय हजारे यांचे कनिष्ठ बंधू प्रकाश हे इन्कम टॅक्स अधिकारी अमेय याचे चुलते आहेत.संजय हजारे यांचे दिवंगत पिताश्री रंगनाथ हजारे यांची लघु पाटबंधारे जिल्हा परिषद उपविभाग येथे अनेक वर्ष सेवा झाली असल्याने अमेय हजारे यांचे आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,अशोकशेठ बाफना ,प्रवीणशेठ चोरोडिया,मच्छिंद्रनाथचे चेअरमन नामदेव राऊत, आष्टीचे माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,जेष्ठ पत्रकार ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,आष्टी तालुका कृषी अधिकारी गोरक्षनाथ तरटे यांचे सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या