आष्टी(प्रतिनिधी)
देशामध्ये शेतमाल पिकविण्यासाठी संशोधन मोठ्या प्रमाणावर झाले आहे.शेतकऱ्यांनी त्या संशोधनाचा शेती करण्यासाठी वापर करावा. आपली अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून असल्याने शेतकरी सुधारला तर देश सुधारेल अशी परिस्थिती आहे.
शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून त्या तंत्रज्ञाना आधारे शेती केल्यास नक्कीच फायदेशीर ठरू शकते.शेतकऱ्यांनी बाजारात येणारी बिगर केमिकल औषधे वापरून दर्जेदार शेतमाल तयार करण्याचे आवाहन आ.सुरेश धस यांनी केले.आपण
राज्यमंत्री असताना आष्टी मतदार संघांमध्ये रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविला होता.त्या उपक्रमाचा आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याने आता तालुक्यात फळबागां वाढल्या आहेत.त्यामध्ये लिंबु बागा वाढल्या
लिंबु उत्पादकांच्या आर्थिक उन्नतीसाठी श्रीगोंदा येथील प्रसिद्ध लिंबु व्यापारी आदिकशेठ वांगणे यांनी कड्यानंतर आष्टीत वांगणे लेमन ट्रेंडींग कंपनीचे दुकान सुरु केले असल्यानेचे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.
आष्टी येथील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजारपेठेत आदिकशेठ वांगणे लेमन ट्रेंडींग कंपनी यांंच्या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी आ.साहेबराव दरेकर हे होते.
वांगणे लिंबु ट्रेनिंग कंपनीचे आ.
सुरेश धस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.पुढे बोलताना आ.धस म्हणाले की,कडा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये श्रीगोंदा येथील प्रसिद्ध लिंबाचे व्यापारी आदिकशेठ वांगणे यांनी लिंबाची आमच्या विनंतीवरून कडा,आष्टीत आडत सुरु केली आहे.ही आज अतिशय आनंदची बाब आहे.
पहिल्याच दिवशी अतिशय दर्जेदार उत्पन्न घेतलेल्या काही शेतकऱ्यांच्या मालांची आवक आज येथे पाहायला मिळाली आहे.या प्रकारचा दर्जा असलेल्या मालाची तालुक्यातील शेतकऱ्यांनी लिंबाचे उत्पादन घेतले तर ते लिंबू नेपाळ,दिल्ली इतर मोठ्या मोठ्या शहरात जाईल यातून चांगला भाव मिळेल असा विश्वास व्यापारी यांच्या शी चर्चा करताना दिला आहे.
आपल्या तालुक्यात लिंबू उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्याने छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी इतरत्र व्यवसाय करण्यापेक्षा कडा,आष्टी बाजार समितीत येऊन व्यवसाय केला तर आम्ही त्यांना जागा व सुविधा उपलब्ध करून देऊ आम्ही त्यांना आमंत्रित करतो.छोटे मोठे लिंबू व्यापारी बाजार समितीत आले तर यातून व्यापारात स्पर्धा वाढल्याने भावाची देखील स्पर्धा होईल यामध्ये शेतकऱ्यांचा देखील फायदा होईल असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.

यावेळी लिंबु व्यापारी आदिकाशेठ वांगणे,बाजार समितीचे माजी उपसभापती गौतमनाना आजबे यांंचे यांची भाषणे झाले.
यावेळी युवानेते जयदत्त धस,
आदिकशेठ वांगणे,नगराध्यक्ष जिया बेग,शैलेश सहस्त्रबुद्धे,सभापती रमजान तांबोळी,ॲड.बाबुराव अनारसे,चेअरमन आदिनाथ सानप,अरुणभैय्या निकाळजे,
माजी सभापती संजय ढोबळे,पत्रकार उत्तम बोडखे,सरपंच परिवंत गायकवाड,अशोक पवार,राजेंद्र गव्हाणे,अशोक लगड
संजयशेठ मेहेर,बुवासाहेब शेकडे
आण्णासाहेब लांबडे,रामशेठ मधुरकर,
यशवंत खंडागळे,आत्माराम फुंदे,गौतम आजबे,सादिक कुरेशी,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मिलिंद निकाळजे,डाॕ.
युवराज तुपेरे,भगवान शिनगिरे,
मधुकरमामा लोखंडे,शरीफ शेख,अरुण सायकड,अरुण पडोळे,रावसाहेब काळे,राहुल मुथा,विठ्ठल राख,कवडे सर,सुनिल सिध्देश्वर,गौतम धस,अमोल मुळे,सुनिल कुलकर्णी,अंबादासशेठ गवारे,सुरेश वारंगुळे,रघुनाथ आवारे,
शिवलिंग लगड,पोपट आजबे,बबन लोंढे,सचिव हनुमंत गळगटे,ॲड.नवनाथ विधाते,अरुण पडोळे आदि मान्यवर उपस्थित होते.उपस्थितांचे आभार कडा कृ.उ.बा.समितीचे संचालक रामशेठ मधुरकर यांनी मानले.
0 टिप्पण्या