आष्टी (प्रतिनिधी)
गेल्या अनेक काळापासून बीड-अहमदनगर राज्य महामार्गावर आष्टी शहरातील विविध ठिकाणी विविध फळांचे आणि भाजीपाल्यांचे विक्रेते अगदी आपली गाडी आणि स्टॉल रस्त्याला लागून उभे करत असत. त्यामुळे पादचारी आणि वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागेल.
काहीवेळा यातून अपघात झाल्याच्या घटना झाल्या आहेत.याबाबीची गंभीर दखल घेत नगरपंचायतने काल प्रत्यक्ष कारवाई करत या सर्व हातगाड्यांना आणि फळे विक्रेत्यांना या रस्त्यावरून हटवून एका विशिष्ट ठिकाणी आठवाडी बाजारतळावर त्यांना विक्रीसाठी ठिकाण उपलब्ध करून दिले.
आष्टी नगराध्यक्षाचा
स्तुत्य उपक्रम
-----------------
गेली अनेक दशकापासून वेगवेगळ्या चौकामध्ये हातगाड्या,फळांचे गाडे,
खाऊची दुकाने असे छोटे छोटे स्टॉल आबाल वृद्ध ग्राहकांना आकर्षित करीत असत.


त्यामुळे नेमक्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असे.बरेच वेळा छोटे मोठे अपघातही या मुळे टाळता येत नसे.दरम्यान या गंभीर बाबीची संवेदनशील मनाने येथील आष्टीच्या नगराध्यक्षांनी हा निर्णय घेतला की,
अशी छोटी मोठी दुकाने चौकात न लावू देता,त्यांची एकाच ठिकाणी व्यवस्था करण्यात आली.त्यामुळे रस्त्यावरची छोटी छोटी अतिक्रमणे हटली आणि येणाऱ्या जाणाऱ्याला त्रासापासून मुक्ती मिळाली.याबद्दल नगराध्यक्ष जिया बेग,आष्टी नगर पंचायत अधिकारी व पदाधिकारी,नगरसेवक यांच्या सहकाऱ्यांचे या अत्यंत महत्त्वाच्या संवेदनशील विषयावर योग्य निर्णय घेऊन कार्यवाही केल्याबद्दल आष्टीकर नागरिकांच्यावतीने कौतुक होत आहे.
रस्त्याचा जीव
मोकळा झाला!
-----------
रस्त्याच्या दोन्ही बाजूने विविध फळे विक्रेते असल्यामुळे शाळकरी मुलांना जाणे मुश्किल होतं असे.राज्यरस्ता असल्यामुळे मोठ-मोठी वाहने या मार्गावरून अहमदनगर-पुणे-मुंबईसारख्या महानगरात जाण्यासाठी असल्यामुळे प्रवासी व वाहनधारकांची आणि वाहन चालकांची एकमेकांमध्ये हमरीतुमरी व्हायची त्यातून अनेक वेळा भांडणे होण्यास रूपांतर व्हायचे.या सर्व बाबींना यानिमित्ताने आळा बसेल असा विश्वास ज्येष्ठ प्रवासी वर्गामधून व्यक्त केला जात आहे.
0 टिप्पण्या