आष्टी (प्रतिनिधी)
सावित्रीमाई तुम्ही होतात म्हणून स्त्रियांनी आपली लढाई जिंकली क्रांतीज्योती सावित्रीमाई तुम्ही होतात म्हणून स्त्रियांची सासर,माहेरची नावे इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदली गेली.
सावित्रीमाई तुम्ही होतात म्हणूनच स्त्रियांनी सर्व क्षेत्रात यशाची शिखरे पदाक्रांत केली असे प्रतिपादन आष्टी येथील हंबर्डे महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापिका स्वाती सुडके- चौधरी यांनी केले.
आष्टी तालुक्यातील क-हेवाडी येथील किसान शिक्षण संस्थेचे हरीनारायण स्वामी विद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये प्रमुख मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
कार्याक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतोष नवले हे होते.या यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,
पत्रकार संतोष सानप,
इंजि.पी.बी.बोडखे,
पंजाब बांगर,भरत दळवी,संजय राऊत ,
सौ.बबीता धोंडे,
बाळकृष्ण भोपळे,
रामदास सांगळे,
आश्राबाई सांगळे ,
आशाबाई सांगळे,
शिलाबाई सांगळे,अनिता घुले,शिरीन पठाण,
सुनिता सांगळे,
रंजना सांगळे,सम्रिन शेख,प्रियंका वनवे,
अनिता सांगळे,ठकु सांगळे,गंगुबाई सांगळे,
लंक सांगळे,संगीता बडे,पुनम सांगळे,प्रतिभा सांगळे,गोरख घुले,समीर शेख आणि भाळवणी व क-हेवाडी येथील माता पालक पुरुष पालक हे मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
यावेळी निकिता सांगळे,
आकांक्षा सांगळे,शुभांगी सांगळे,शिफा पठाण,
जनाबाई वनवे,भक्ती सांगळे,वंदना सांगळे,
साक्षी सांगळे,मिजबा पठाण,पुजा सांगळे,
मोनिका सांगळे,सुप्रिया सांगळे,कविता सांगळे,
शामल सांगळे,ओंकार सांगळे,सुमेरा शेख या विद्यार्थ्यांंची समयोजीत भाषणे झाले.यावेळी अतिशय बहारदार सुत्रसंचलन सविता सानप या विद्यार्थ्यांंनीने तर आभार सुप्रिया सांगळे,
हीने मानले.पुढे बोलताना प्राध्यापिका स्वाती सुडके म्हणाल्या की,सुमारे १७५ वर्षांपूर्वी अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये ज्या काळामध्ये मुलीचा जन्म हे पाप समजले जायचे त्या काळात लक्ष्मीबाई आणि खंडोजी नेवसे पाटील या दांपत्याच्या पोटी सावित्रीबाईंनी जन्म घेतला.
या दांपत्याने आपल्या घरात कन्यारत्न जन्मल्याचा उत्सव साजरा केला आणि थाटामाटात मुलीचं बारसं करून सावित्री असं नाव ठेवलं वडील खंडोजी यांचे पाटील घराणे असल्यामुळे गावातील तंटेबंटे त्यांच्या घरी मिटले जायचे आणि वडिलांचे न्यायदानाचे काम प्रत्यक्ष डोळ्यादेखत पाहिले असल्यामुळे असल्यामुळे बालपणीच सावित्रीबाईंच्या मनावर वडिलांचे संस्कार झाले.त्या काळामध्ये वाहतुकीची साधने आणि इतर साधनसामग्रीची कमतरता असल्यामुळे सावित्रीबाईंचे लग्न वयाच्या ९ व्या.वर्षी तर ज्योतिबा फुले यांचे वय १४ वर्षे असताना झाले.त्याकाळात मुलीच्या विवाहाची पात्रता केवळ मुलीला चुलीवर भाकरी थापता येतात काय एवढीच पात्रता असायची कारण नवऱ्याला स्वयंपाक करून जेऊ घालणे म्हणजेच केवळ चूल आणि मूल एवढंच कार्यक्षेत्र स्त्रियांच्या वाट्याला येत होते.म.ज्योतिबा फुले यांचे शिक्षण चौथीपर्यंतच झाले होते कारण शाळा या इंग्रजांच्या आणि उच्च वर्णीयांच्या होत्या.चौथीपर्यंतच शिक्षण होऊन त्यांचे शिक्षण थांबले होते तरीही महात्मा ज्योतिबा फुले यांनी इंग्रजी भाषा आत्मसात केली होती सावित्रीबाईंनी देखील ज्योतिबा फुले यांच्याबरोबर समाजकार्यात धडाडीने सहभाग घेतला होता त्यामुळेच सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हणून मान्यता मिळाली आहे.भारतीय समाज सुधारकांमध्ये स्थान मिळाले आहे.





भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांचे अतिशय उच्च स्थान असून तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांचे अधिकारांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी स्वतःअभ्यास करून महात्मा फुले यांचे सोबतीने महिलांच्या अधिकारासाठी महान कार्य केले आहे सन १८४८ मध्ये समाजातील पुराणमत्ववाद्यांच्या विरोधात जाऊन पुणे येथे भिडेवाडा येथे या ठिकाणी मुलींची शाळा सुरू केली.त्यावेळी त्यांना असंख्य अडचणी आल्या अनेकवेळा अपमान सहन केला परंतु त्यांनी जिद्दीने मात करून सर्व संकटांवर मात केली आणि महिलांच्या अधिकाराबाबत अत्यंत कोवळ्या वयात विधवा झालेल्या महिलांचे केशवपन करणे विधवांचे पुनर्विवाह करू न देणे आणि अल्पवयीन मुलींचे वृद्ध माणसांबरोबर विवाह लावून देणे म्हणजे विवाह पद्धती बंद करण्यासाठी फार मोठे कार्य केले आहे.या महान व्यक्तिमत्व मुळेच आज स्त्रियांना सर्व समाजामध्ये मानाचे स्थान मिळाले आहे असे सांगत प्रा.
स्वाती सुडके-चौधरी पुढे म्हणाल्या की,त्यांच्या या महान कार्याबद्दल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यांचे संपूर्ण जीवन हे आदर्श असून सावित्रीबाई होत्या म्हणूनच माझ्यासारखी मुलगी शिकली,सवरली,मोठी झाली,अभ्यास करू शकली आणि आज तुमच्यासमोर अभिमानाने सावित्रीमाईंचे विचार मांडू शकली असे शेवटी सांगितले.शेवटी अध्यक्षीय समारोप व उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक संतोष नवले यांनी मानले.
यावेळी सर्व विद्यार्थी,
माता,पुरुष पालकांना स्नेहभोजन देण्यात आले.
0 टिप्पण्या