Ticker

6/recent/ticker-posts

वृत्तपत्र विक्रेते भीमराव गुरव यांना दर्पणकार पुरस्कार जाहीर

आष्टी(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा बीडच्या वतीने दि.६ जानेवारी दर्पण दिनानिमित्ताने " दर्पण दिन "मान्यवरांना सन्मानीत करून साजरा करण्यात येतो.या पुरस्काराचे मानकरी आष्टी तालुक्यातील आष्टी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा पेपर विक्रेते भीमराव गुरव ठरले असून मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानीत करण्यात येणार आहे. बीड येथील स.मा.गर्गे भवन येथे शनिवार दि.६ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण या दिनाचे औचित्य साधून पत्रकारसंघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि संपादक संतोष मानुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.माजी अध्यक्ष तथा वृतपत्र विक्रेते भीमराव गुरव यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राजकीय,सामाजिक, व्यापारी,आष्टी तालुका पत्रकार संघ,आष्टी तालुका युवा पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य आणि आष्टी तालुका गुरव संघटना,जोगेश्वरी पारगाव ग्रामस्थ यांच्यासह सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. चौकट ******** आष्टी शहरात गेल्या ३८ वर्षापासून पेपर विक्रेता व्यवसाय करत पाचही भावंडांना यशस्वीरित्या जोगेश्वरी उदयोग समूहाद्वारे व्यवसायात उत्तुंग यशस्वी भरारी घेत पेपर विक्रेतेच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करत यश कसे मिळते हे भीमराव गुरव यांनी वृत्तपत्र विक्रीच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.हा सन्मान गुरव यांना मिळाल्याने युवकांना प्रेरणा आणि ऊर्जा देणारा ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या