

आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या " हर घर नळ " या संकल्पनेतून आलेल्या जल-जीवन योजनेच्या माध्यमातून गावचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.जलजीवन ही गावाला नवसंजीवनी देणारी योजना आहे.या योजनेच्या माध्यमातून गावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याचे प्रतिपादन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले.
आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील दीड कोटी रूपयाच्या जलजीवन कामाचे भुमीपुजन माजी.आ.
भीमराव धोंडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथे पाण्याची टंचाई पाहता माजी आ.भीमराव धोंडे यानी या गावाचा पाणी प्रश्न कायमचा मिटावा म्हणून जलजीवन योजनेच्या माध्यमातून १ कोटी ५२ लाख रूपये निधी उपलब्ध करुन दिला.
या कामाचे भुमीपुजन सोमवार दि,८ जानेवारी रोजी माजी आ.भीमराव धोडे याच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच संजयकाका नालकोल म्हणाले की, जलजीवन कामाच्या माध्यमातून आता पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. भविष्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार नाही.त्यांच्या डोक्यावरील हंडा खाली येणार आहे.शंभर टक्के दर्जेदार काम केले जाईल असा विश्वास गावातील जनतेला दिला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सेवानिवृत्त उपअभियंता एल.डी.हुले,सरपंच तात्यासाहेब नालकोल,उपसरपंच विष्णू मांढरे,कडा कृ.उ.बा.बाजार समितीचे उपसभापती नामदेव धोंडे,
माजी उपसरपंच अनिल गजघाट,रावसाहेब धोंडे,अजिनाथ कन्हेरकर,योगेश फरांडे, ग्रा.पं.
सदस्य सागर फरांडे,शरद पवार,छगन खोडके,किसन फरांडे,राजेश आडकर,संपत कव्हळे,रघुनाथ नालकोल,महादेव धोंडे सर,मारुती शिवरकर,मारुती सत्रे,अजय कापरे,सुरेश बनसोडे,प्राचार्य आजिनाथ बोडखे सर,
पांडुरंग धोंडे,हरिभाऊ खोडके,अविनाश बनसोडे,मनोज बनसोडे,
केशव भिसे,सुरज भिसे शिवम नालकोल,डॉ.
हनुमंत बनसोडे,सागर धोंडे,नामदेव पवार आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या