आष्टी (प्रतिनिधी)
गेल्या १७ वर्षाची परंपरा असलेल्या आणि आपल्या मातापित्यांच्या स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय गंगाई-बाबाजी महोत्सव अत्यंत नियोजनबद्ध आणि सक्षमपणे निभावणारे शिक्षण महर्षी माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून आयोजित राज्यस्तरीय गंगाई - बाबाजी महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.कवी प्रा.प्रशांत मोरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन तर कवी इंद्रजीत भालेराव यांच्या सुमधुर कवितांनी समारोप होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
आष्टी तालुक्यातील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक
अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे यांचे माता-पिता स्मृतिप्रीत्यर्थ आष्टी येथील भगवान महाविद्यालयामध्ये १८ वा. गंगाई - बाबाजी महोत्सव मंगळवार दि.२३ ते गुरुवार दि.२५ जानेवारी २०२४ या दरम्यान संपन्न होणार आहे.या सोहळ्याचे उद्घाटन मंगळवार दि.२३ जानेवारी २०२४ सकाळी १० वा.प्रसिद्ध कवी प्रा.
प्रशांत मोरे यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आ.
भीमराव धोंडे हे भुषविणार आहेत.
दरम्यान या महोत्सवातील सर्व स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ आष्टीकरांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य डाॕ.
दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.
वक्तृत्व व काव्यवाचन स्पर्धांचे आयोजन
--------------------------
उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी १२ वा.वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 'शेतकऱ्यांची सद्यस्थिति आणि सरकारची धोरणे,
वाढती बेरोजगारी;
कारणे व उपाय आणि नविन शैक्षणिक धोरण आणि आजचा विद्यार्थी' हे तीन विषय स्पर्धेसाठी आहेत.दुपारी ३ वा.काव्यवाचन स्पर्धा
होणार आहे.
खुल्या लावणीनृत्य,
लोकगीत स्पर्धांची पर्वणी
--------------
बुधवार दि.२४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वा. खुल्या लोकगीत स्पर्धा संपन्न होणार आहेत.याच दिवशी दुपारी ३ वाजता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यादिवशी सायंकाळी ५ वाजता राज्यस्तरीय लावणीनृत्य स्पर्धा संपन्न होणार आहे.लोकगीत व लावणी स्पर्धेच्या एक तास अगोदर आपले गीत पेनड्राईव्हमध्ये संयोजन समितीकडे जमा करावे.
लोकगीत प्रकारात कोळीनृत्य,आदिवासी नृत्य,गोंधळनृत्य,
आराधीगीत,भलरीगीत,धनगरी गीत यांचा समावेश आहे.
समारोप प्रसंगी बक्षीस वितरण व गंगाई बाबाजी आदर्श पुरस्कार सोहळा रंगणार!
---------------------
गुरुवार दि.२५ जानेवारी रोजी सकाळी समारोप,
बक्षीस वितरण व
" गंगाई- बाबाजी " आदर्श पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांंची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे,प्रमुख उपस्थिती युवानेते डाॕ.अजयदादा धोंडे यांची असणार आहे.आंतर महाविद्यालयीन स्पर्धेसाठी पारितोषिके (वक्तृत्व व काव्यवाचन) या स्पर्धेसाठी प्रथम वैयक्तिक बक्षीस ७ हजार रु,द्वितीय बक्षीस ५ हजार रु ,तृतीय बक्षीस ३ हजार रु असे बक्षिसे असणार आहेत.खुल्या लोकगीत स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ०९ हजार रु,द्वितीय बक्षिस ७ हजार रु, तृतीय बक्षिस ५ हजार रु,उत्तेजनार्थ बक्षीस २ हजार रु.तर लावणीनृत्य स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ११ हजार रु, द्वितीय बक्षीस ९ हजार रु,




तृतीय बक्षीस ७ हजार रू, उत्तेजनार्थ बक्षीस ३ हजार रु अशी बक्षिसे आहेत.वक्तृत्व व काव्यवाचन या स्पर्धेत फक्त इयत्ता ११ वी ते पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनाच सहभाग घेता येईल.मात्र लावणीनृत्य व लोकगीते हे कलाप्रकार सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.अशी सूचना आयोजकांनी दिली आहे.भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ, उपप्राचार्य डाॕ.ज्ञानदेव वैद्य,उपप्राचार्य डाॕ.
आप्पासाहेब टाळके,
उपप्राचार्य प्रा.सुनिल भवर,डाॅ.बाळासाहेब गावडे,डॉ.
आबासाहेब पोकळे,
डाॕ.वंदना घोडके हे संयोजक समितीमध्ये काम पाहात आहेत.
********************
0 टिप्पण्या