Ticker

6/recent/ticker-posts

आज आष्टी ते अंमळनेर या रेल्वे मार्गावर होणार हायस्पीड चाचणी ************************ नागरिकांनी या लोहमार्गावर थांबु नये ; रेल्वे प्रशासनाचे आवाहन

आष्टी (प्रतिनिधी) ब-याच वर्षाची प्रतिक्षा.संपली.... बीड जिल्हावासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न बीड- नगर- परळी रेल्वेचे आष्टी ते अंमळनेर मार्गावरील ३० कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे.शुक्रवार दि. ५ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ६ यावेळात तशी ११० कि.मि. वेगाने हायस्पीड चाचणी होणार आहे.त्यामुळे या लोहमार्गावर नागरिकांनी थांबु नये असे आवाहन मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.प्रशासन पातळीवर सुचना करण्यात आल्या आहेत. बीड -नगर -परळी या मार्गावरील नगर ते आष्टी रेल्वे मागील वर्षे सुरू झाली त्यानंतर पुढील टप्पा आता आष्टी ते विघनवाडी हा देखील पूर्ण झाला आहे.आज शुक्रवार दि.५ जानेवारी रोजी आष्टी ते अंमळनेर या ३० कि.मी.मार्गावर ११० कि.मी.प्रति तास या वेगाने हायस्पीड चाचणी होणार आहे.अहमदनगर ते न्यू आष्टी या ६६ कि.मी.अंतरावर विद्युतीकरणाचे हे काम पूर्ण झाले आहे.गुरुवारी रेल्वेगाडी हायस्पीड धावणार असल्याने प्रशासनाला तशा मध्यरेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सुचना करण्यात आल्या आहेत.या मार्गावर लोकांनी रेल्वे मार्गामध्ये थांबु नये,आपली जनावरे बांधु नयेत,अशा सुचना उपमुख्य अभियंता निर्माण मध्य रेल्वे अहमदनगरच्या अधिकाऱ्यांनी दिल्या असुन तसे आदेश जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी,पोलीस ठाणे आष्टी,अंभोरा यांना देण्यात आल्या आहेत. अहमदनगर-आष्टी ते अंमळनेर रेल्वे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार अशी बातमी दैनिक झुंजारनेतामध्ये प्रकाशीत करण्यात आली होती.नवीन वर्षात अंमळनेरपर्यंतच्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन होणार असा अंदाज होता.तो अंदाज खरा ठरत आहे.दि.२३ डिसेंबर २०२३ रोजी आष्टी येथून न्यू आष्टी -नगर रेल्वेची सुरुवात झाली होती. त्यानंतर आता अंमळनेरपर्यंतचे काम पूर्ण झाल्याने नगर -अंमळनेर पर्यंत ही रेल्वे धावणार आहे.आष्टी-अहमदनगर-बीड- परळी नवीन लाईन हा एकूण लांबी २६१.२५ कि.मी. रेल्वे मार्ग आहे. मागील वर्षी २३ संप्टेंबर २०२२ रोजी ६६.१८ कि.मी.पुर्ण
अहमदनगर ते न्यू आष्टी फेरी ही सुरू झाली आहे.या न्यू आष्टी ते बीडजवळील इगनवाडी हा ६७.१२ कि.मी.रेल्वे मार्ग पुर्ण होत आहे.नवीन वर्षात अहमदनगर ते इगीनवाडीपर्यत (बीडजवळ) रेल्वे धावणार आहे. एकूण २६१.२५ कि.मी.पैकी १३३.३ कि.मि.चे काम आता पुर्ण झाल्याने ही रेल्वे धावणार आहे.गेल्या अनेक वर्षापासून बीडकरांचे अधुरे राहिलेले स्वप्न आता पुर्णत्वाकडे जात आहे.अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे प्रगती पथावर काम सुरू आहे. हा मार्ग एकूण २६१.२५ कि.मी.चा आहे.यापैकी २३ सप्टेंबर २०२२ रोजी अहमदनगर- न्यू आष्टीपर्यंत पूर्ण होऊन रेल्वेची नियमित फेरीही सुरू झाली.आता दुस-या टप्प्यात न्यू आष्टी ते बीड जवळील इनगवाडी हे काम पुर्ण झाले आहे. आतापर्यंत पूर्ण झालेली कामे ---------------- अर्थ वर्क- ४३० LCum / ४१८ LCum (९७ टक्के ),प्रमुख पूल- ६४/४९ (७७ टक्के ),छोटे पूल/RUB- ३०२/२४९ (८२ टक्के ),रोड ओव्हर ब्रिज- ६५/१४ (२१ टक्के ),रोड अंडर ब्रिज -१३०/११० (८५ टक्के ),स्टेशन इमारती - २१/१० (२९ टक्के ), ट्रॅक लिंकिंग-२६१/११५ (११५ कि.मी.)SHXT (४४ टक्के ),पॉवर लाईन क्रॉसिंग -६२६/५६८ (९१ टक्के ),बॅलास्ट पुरवठा-७.५२/६.४४ एलसीएम (८६ टक्के ),विद्युतीकरण- निविदा मंजूर झाली. -----------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या