Ticker

6/recent/ticker-posts

कार्यक्रम सुंदर,नेटका आणि अप्रतिम करणाऱ्या शब्दप्रभूंचा गौरव! ---------------------------------------- निवेदक ज्ञानदेव काशीद आणि प्रा.बिभिषण चाटे यांचे निवेदन क्षेत्रात योगदान

आष्टी(प्रतिनिधी ) आज सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सांगितिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विविध स्वरूपांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.हे कार्यक्रम सु नियोजित पणे आणि नीटनेटके पद्धतीने संपन्न होण्यात सूत्रसंचालकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते;चांगल्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम देखना आणि बहारदार होतो.ही वास्तववादी भूमिका निभावत बीड जिल्ह्यातील प्रतिभा संपन्न सूत्रसंचालक,निवेदक ज्ञानदेव काशीद आणि प्रा.बिभिषण चाटे यांच्या अभिरुची संपन्न आणि परिणामकारक सूत्रसंचालनाची दखल घेत एका विवाह सोहळ्याच्या मंचावर मान्यवरांनी गौरव करत दाद दिली.निमित्त होते पत्रकार विजय जाधव यांच्या कन्येच्या विवाह समारंभाचे.या विवाहसमारंभाचे निवेदन अत्यंत वेधकपणे त्यातील गुंफण करण्याचे कौशल्य,निवेदनातील परिणामकारकता कार्यक्रम चैतन्यमय करणारा सूत्रसंचालक म्हणून त्यांनी अत्यंत सक्षमपणे जबाबदारी पेलली. ज्ञानदेव काशीद आणि प्रा.बिभिषण चाटे यांनी विविध प्रसंग,अवतरणे,सुवचने,किस्से, काव्यपंक्ती आणि आवश्यक ते संदर्भ देत बहारदार सूत्रसंचालनाची गुंफण केली.यातून त्यांची शब्दफेक,देहबोली,सभाधिटपणा सहजता,उत्स्फूर्तता निवेदन कौशल्य प्रसंगावधान आणि संवाद शैलीचे रसिक प्रेक्षकांना दर्शन झाले.याची दखल घेत आणि कौतुक करत यावेळी उपस्थित माजी मंत्री आमदार सुरेश धस,जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.रामकृष्ण रंजवे बापू, ह.भ.प.राधाताई सानप महाराज,सभापती सुवर्णाताई लांबरुड,जि.प.सदस्य माऊली आप्पा जरांगे,विजय जाधव यांनी विशेष कौतुक करत शाब्बासकी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या