

आष्टी (प्रतिनिधी)
ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादनासाठी भीमा कोरेगाव येथे प्रचंड मोठा जनसागर लोटला होता.'जय भीम'ची गर्जना देत निळ्या ध्वजांसह लोटलेल्या अनुयायांच्या गर्दीने अहमदनगर-पुणे रस्ता अक्षरशः फुलून गेला होता.अभिवादनासाठी लाखोंच्या संख्येने आलेल्या भीम अनुयायांसह दिवसभर अनेक मान्यवरांनीही
विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
आष्टी शहरातील अनिलभैय्या नगरातही भीमसैनिकांनी विजयस्तंभाची प्रतिकृती तयार करुन भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंंबेडकर आणि या विजयस्तंभाची दिप,धुप पुजन व वंदना घेऊन शौर्यदिन साजरा केला.यावेळी शेतकरी शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र धोंडे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,इंजि.
डी.एस.देशमुख यांंच्या हस्ते दिपपुजन करण्यात आले.आष्टीत विजयस्तंभाची केलेली प्रतिकृती हा चर्चेचा विषय बनला होता.यावेळी संपतराव गायकवाड म्हणाले की,अस्पृश्य इंग्रजांच्या पदरी होते.या शुर लढवैय्य सैनिकांना पेशव्याच्या विरुध्द लढवुन भारतावर सत्ता प्रस्थापित करण्याचे मनसुबे महारसैनिकांच्या लक्षात आले.इंग्रजाची सत्ता अस्पृश्यांना मान्य नव्हती.खरे तर आपल्याच देशबांधवाच्या विरुध्द लढणे योग्य नव्हते.महार सैनिक प्रमुख सिदनाक दुसऱ्या बाजीराव यांना भेटण्यासाठी गेला.आम्ही महार सरदार तुमच्या बाजुने ब्रिटीशांविरुध्द लढाईत उतरु ईच्छीतो.तुम्ही आम्ही मिळुन इंग्रजाना हाकलुन लावु परंतु तुमच्या राज्यात महार जातीला काय स्थान राहिल ? आम्हांला माणसासारखी वागणूक मिळेल का? त्यावर दुसरे बाजीराव म्हणाले,सुईच्या टोकावर बसेल ईतके धुळीचा कण ईतके स्थान मिळणार नाही असे सांगीतले.तुम्ही आमच्या बाजुने लढले तरी तुम्हांला तुमच्या पायरीप्रमाणे राहावे लागेल असे सांगीतले होते.ब्राम्हणी धर्मात कोणताही बदल होणार नाही.तुम्हांला तुमचे स्थान हवे असेल तर ते मिळवुन दाखवा असे सुनावले.हे ऐकुन सिदनाकची तळपायाची आग मस्तकात गेली.स्वाभिमानी सेनापती सिदनाक इंग्रजाला मिळाला.भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ रोजी पहिल्या महार रेजीमेंटनच्या व्दितीय बटालियनच्या ५०० महार वीर सैनिकांनी पेशव्यांच्या ३० हजार सैन्याचा पराभव केला.या भीमा कोरेगावच्या लढाईत २३ महार सैनिक शहीद झाले.याशहीद शुरवीरांचे कायम स्मरण रहावे म्हणुन म्हणुन २६ मार्च १८२१ मध्ये भीमा नदीच्या तिरावर भव्य आसा विजयस्तंभ उभारला.हे युध्द आत्मसन्मानासाठी आणि माणुसकीसाठी झाले होते.जर महार जातीला समतेची वागणूक मिळली असती तर वेगळेच चित्र दिसले असते असे संपतराव गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगीतले.
यावेळी ॲड.रत्नदीप निकाळजे,
सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बबनराव खंडागळे,ॲड.सतीष
गायकवाड,कारभारी धोंडे,ॲड.गौतम निकाळजे,निलेश सोनवणे,डाॕ.लोंढे,प्रा.
अमोल निकाळजे,ग्रा.पं.संतोष कदम,
सेवानिवृत्त ग्रामसेवक बी.एच.कांबळे,
ग्रामसेवक पी.बी.शाहीर,वडमारे,ॲड.
पवार,ॲड.राजदीप निकाळजे,ॲड.
पगारे,अशोक निकाळजे,उद्योगजक प्रदीप कांबळे,मिलींद निकाळजे,पोर्णिमा निकाळजे,राजश्री
गायकवाड,सुमन गायकवाड,विमल निकाळजे,लता खंडागळे,मंदाकिनी कांबळे,सुशिला वडमारे,माजी पंचायत समिती सदस्य प्रज्ञा निकाळजे,उर्मिला निकाळजे,
संगीता खंडागळे,अनुसया निकाळजे,
साक्षी गायकवाड,रिचा निकाळजे,
जान्हवी मोरे,भाग्यश्री खंडागळे आदि सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.संचलन मिलींद निकाळजे यांनी तर आभार ॲड.सतीषकुमार गायकवाड यांनी मानले.खीरदान वाटप करुन हा शौर्यदिन कार्यक्रमाचा समारोप झाला.
0 टिप्पण्या