Ticker

6/recent/ticker-posts

आजोबाचे बोट धरून सव्वा वर्षाच्या नातवाची वाटचाल,......... जुन्या काळातील एकत्र कुटुंबातील संस्काराला उजाळा

आजोबाचे बोट धरून सव्वा वर्षाच्या नातवाची वाटचाल.. ---------------------------------------- जुन्या काळातील एकत्र कुटुंबात
ील संस्काराला उजाळा ---------------------------------------- फोटो ---------------------------------------- आष्टी ( प्रतिनिधी ) भारतीय संस्कृती ही जगात श्रेष्ठ मानली जाते.येथील संस्कार परंपरा एकमेकांचा आदर करण्याची प्रथा आदीसह मूल्य जपण्यात या भूमीची महिती जगात आहे.जुन्या काळात एकत्र कुटुंब पद्धतीतून संस्कार आणि आदरातीथ्य रुजवले जात असत.आजोबांच्या मार्गदर्शनातून नातूंचा प्रवास होत असे. असाच प्रकार आज आष्टीत बघायला मिळाला.बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरात सद्यस्थितीत अनेक मोकळ्या प्रांगणात सकाळ संध्याकाळ चालण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे आणि त्यांचा आदिराज हा सव्वा वर्षाचा नातू आज शुक्रवारी मोकळ्या रस्त्यावरील तसेच मैदानात फेरफटका मारत होते.यावेळी केवळ सव्वा वर्षांचा त्यांचा नातू त्यांच्या हाताला धरून अत्यंत आनंद आणि उत्साहात चालत होता. या चालण्यातून मोठ्यांचे संस्कार शिकवण तसेच मोकळा श्वास आरोग्यदायी आणि व्यायामाचे वातावरण शरीर आणि मनासाठी उपयुक्त ठरतात.यानिमित्ताने आजोबा आणि नातवांचे हे बोलके छायाचित्र टिपण्याचा मोह मोबाईलधारकाला आवरता आला नाही.जुन्या काळातील एकत्र कुटुंबाचे महत्त्व या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या