
उत्तम बोडखे,आष्टी.
---------------------
गेल्या १७ वर्षाची परंपरा असलेल्या आणि आपल्या मातापित्यांच्या स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय गंगाई बाबाजी महोत्सव अत्यंत नियोजनबद्ध आणि सक्षमपणे निभावणाऱ्या आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाचे शिक्षण महर्षी माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून आयोजित यंदाच्या राज्यस्तरीय गंगाई -बाबाजी महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून कवी प्रा.प्रशांत मोरे यांच्या हस्ते उद्घाटन तर कवी इंद्रजीत भालेराव यांच्या सुमधुर कवितांनी समारोप होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
आष्टी तालुक्यातील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे यांचे माता-पिता स्मृतिप्रीत्यर्थ आष्टी येथील भगवान महाविद्यालय मैदानावर गंगाई - बाबाजी महोत्सव २०२४ भगवान काॕलेजच्या आवारात सोमवार दि.२२ ते २५ जानेवारी या चार दिवशीय होणार आहे.या सोहळ्याचा या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ सकाळी १० वा.प्रसिद्ध कवी प्रा.प्रशांत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे हे भुषविणार आहेत.
दरम्यान,या महोत्सवातील सर्व स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ आष्टीकरांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य डाॕ.दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.
वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन
----------------------
उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी १२ वा.वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची सध्यस्थिति आणि सरकारची धोरणे,वाढती बेरोजगारी;कारणे व उपाय आणि नविन शैक्षणिक धोरण आणि आजचा विद्यार्थी हे तीन विषय स्पर्धेसाठी आहेत.
महाविद्यालयीन स्नेहसंमेलन आणि वार्षिक स्नेहसंमेलन होणार आहे.
काव्यवाचनासह विविध
स्पर्धांची पर्वणी
------------------
मंगळवार दि.२२ जानेवारी २०२४ रोजी काव्यवाचन स्पर्धा,संस्थेतील शाळा,महाविद्यालयाचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.बुधवार दि.२४ जानेवारी रोजी लोककला,
भारुड,गोंधळ गीत स्पर्धा होतील.
लोकगीत व लावणी.
-------------
या स्पर्धेच्या स्पधकांनी स्पधेच्या ३० मिनीट आगोदर आपले लावणी नृत्याचे गीत पेनड्राईव्हमध्ये संयोजन समितीकडे जमा करावे.लोकगीत प्रकारात कोळीनृत्य,आदिवासी नृत्य,गोंधळनृत्य,
आराधीगीत,भलरीगीत,धनगरी गीत यांचा समावेश आहे.
समारोप प्रसंगी बक्षीस वितरण
व पुरस्कार सोहळा रंगणार!
-------------------
गुरुवार दि.२५ जानेवारी रोजी सकाळी समारोप,बक्षीस वितरण व "गंगाई- बाबाजी" आदर्श पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांंची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे,प्रमुख उपस्थिती युवानेते डाॕ.अजयदादा धोंडे यांची असणार आहे.
आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेसाठी पारितोषिके वक्तृत्व व काव्यवाचन या स्पर्धेसाठी प्रथम वैयक्तिक बक्षीस ७ हजार रु,द्वितीय बक्षीस ५ हजार रु,तृतीय बक्षीस ३ हजार रु असे बक्षिसे असणार आहेत.खुल्या स्पर्धेत पारितोषिके लोकगीते स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ११ हजार रु,द्वितीय बक्षिस ७ हजार रु, तृतीय बक्षिस ५ हजार रु,उत्तेजनार्थ बक्षीस २ हजार रु तर लावणी नृत्य स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस १५ हजार रु,द्वितीय बक्षीस १२ हजार रु,तृतीय बक्षीस ९ हजार रू,उत्तेजनार्थ बक्षीस ३ हजार रु असे बक्षिसे आहेत.या स्पर्धेसाठी वकृत्व काव्यवाचन या स्पर्धेत फक्त इयत्ता ११ वी. ते पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनाच सहभाग घेता येईल.मात्र लावणीनृत्य व लोकगीते हे कलाप्रकार सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे अशी सूचना आयोजकांनी दिली आहे.भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ,उपप्राचार्य डाॕ.ज्ञानदेव वैद्य,
उपप्राचार्य डाॕ.आप्पासाहेब टाळके,
उपप्राचार्य सुनिल भवर,प्रा.डॉ.
बाळासाहेब गावडे,प्रा.डॉ.आबासाहेब पोकळे,प्रा.डाॕ.वंदना घोडके हे संयोजक समितीमध्ये काम पाहात आहेत.
********************
0 टिप्पण्या