आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील आष्टी तालुका पत्रकार संघाच्यावतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त " पञकार दिन " मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
आज शनिवार दि.६ जानेवारी रोजी सकाळी आष्टी तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी शहरातील पत्रकार भवनात विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल संतोषशेठ मेहेर (व्यापार),नगराध्यक्ष जिया बेग (सामाजिक),पंडीत पोकळे
(युवा सरपंच),नीतीन आळकुटे (पक्षीमित्र),अरुण कांबळे (प्रशासकीय सेवा),शिवाजी गोरे (उत्कृष्ट कर्मचारी) या सहा मान्यवरांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.यावेळी आष्टी तालुका पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित राहणार आहे.ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे,उत्तम बोडखे,सीताराम पोकळे,दत्ता काकडे,भीमराव गुरव,विनोद ढोबळे,रघुनाथ कर्डीले,शरद तळेकर,शरद रेडेकर,गणेश दळवी,सचिन रानडे,प्रवीण पोकळे
,मनोज पोकळे आष्टी तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
********************
0 टिप्पण्या