उत्तम बोडखे,आष्टी.
---------------------------
आष्टी येथील पं.जवाहरलाल नेहरू
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आपल्या
अंगभूत कला गुणांचे, कौशल्याचे प्रदर्शनासाठी हे वार्षिक स्नेहसंमेलनाचे व्यासपीठ
असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना त्यांच्या कला कौशल्यासाठी प्रेरित
करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन युवा नेते डाॕ.अजयदादा धोंडे यांनी केले.
आष्टी येथील पं.जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाद्वारे आयोजित
वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक शिक्षण महर्षी माजी आमदार भीमराव धोंडे,
सौ.दमयंतीताई धोंडे, सौ.अक्षदा धोंडे,सौ. पायल धोंडे, संचालक विठ्ठलराव
बनसोडे,राजेंद्र धोंडे,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,उत्तम बोडखे,
सेवानिवृत्त उपप्राचार्य बीभाऊसाब ढोबळे,प्राचार्य सुरेश बोडखे ,उपप्राचार्य सुनिल
भवर,पंचायत समितीचे माजी सभापती आदिनाथ सानप,गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव,कासारी
मुर्शदपुर ग्रा.पं.चे सरपंच अशोक मुळे,आष्टी नगरपंचायतचे नगरसेवक सुनील रेडेकर,
माऊली बोडखे, इंजि,पी.बी. बोडखे,पिनु धनवडे, बाजीराव वाल्हेकर,बाबु
कदम,डॉ.चंद्रकांत गोसावी,अविशांत कुमकर,आण्णासाहेब साबळे,प्रा.बबन उकले, डॉ.नदीम
शेख,बबन शेकडे उपस्थित होते.पुढे बोलताना युवा नेते अजय धोंडे म्हणाले की,
विद्यार्थी जीवनामध्येच आपल्या जीवनाची दिशा ठरत असते. आपल्या अंगभूत कलेला विकसित
करून कला क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप घेता येऊ शकते.आज अनेक कलाकार असे आहेत की
त्यांनी विद्यार्थी दशेपासून अत्यंत परिश्रमपूर्वक आपल्या अंगभूत कला विकसित करून
नाट्य आणि सिने जगतामध्ये उत्तुंग यश प्राप्त केले आहे त्यामुळे समोरील
विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले की, आपण देखील कलाक्षेत्रामध्ये उत्तुंग यश
प्राप्तीसाठी प्रयत्न करावेत आणि त्यांच्या पालकांनी देखील आपल्या मुलांच्या
अंगीभुत असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन
ही त्यांनी शेवटी केले.प्रास्ताविक करताना पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च
माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुरेश बोडखे यांनी सन २०२२-२०२३ या शैक्षणिक
वर्षातील आढावा सादर करताना सन २०२३ शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी
परीक्षेमध्ये १०० टक्के म्हणजे सर्व १८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इयत्ता आठवी
एनएमएमएस परीक्षेत ६७ विद्यार्थी बसले पैकी ५५ उत्तीर्ण झाले.इयत्ता आठवी
शिष्यवृत्ती परीक्षेत ६७ विद्यार्थी पैकी ३० शिष्यवृत्तीधारक ठरले. इयत्ता पाचवी
शिष्यवृत्ती परीक्षा ३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी १० विद्यार्थी
शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. मंथन परीक्षेत बसलेले सहावी व सातवीचे १८०
विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. त्याचबरोबर विविध क्रीडा प्रकारामध्ये पंडित जवाहरलाल
नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पृहणीय यश मिळवले असल्याचे सांगितले.
*बहारदार सांस्कृतिक


कार्यक्रमांची मेजवानी!*
या स्नेहसंमेलनामध्ये सांस्कृतिक
कार्यक्रमांतर्गत शुभारंभ श्री गणपती गीत त्यानंतर दुष्काळाचे छायेतील
शेतकऱ्यांच्या हृदयातील आर्त हाक असलेले.." देवाक काळजी रे " हे गीत सादर करण्यात
आले त्यानंतर चंद्रमुखी या चित्रपटातील चंद्रा ही लावणी सादर करण्यात आली..
त्यानंतर तांडव नृत्य "हर हर शिवशंकर नीलकंठ ही शिवस्तुती सादर झाली "त्यानंतर
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या जीवनाशी नाते सांगणारे काठी न घोंगड घेऊ द्या की रे मला
बी जत्रेला येऊ द्या की या गीत सादरीकरणाला विद्यार्थी आणि प्रेक्षकांनी मोठी दाद
दिली त्यानंतर आई तुझे देऊळ हे कोळीगीत सादर करण्यात आले आपली संस्कृती दर्शवणारे
तुफान आलं हे गाणं सादर करण्यात आले.
*हळदी कुंकू कार्यक्रम;
हिंदू संस्कृतीचे
दर्शन!*
हळदीकुंकू या कार्यक्रमांमध्ये अत्यंत विनोदी स्वरूपाचे उखाणे या
विद्यार्थिनींनी सादर करून प्रेक्षकांमध्ये हास्यकल्लोळ उडवून दिला त्यानंतर वाघ्या
मुरळी येळकोट येळकोट जय मल्हार हे गीत सादर केले आणि परीक्षा आली की विद्यार्थी
अंतर्मुख होतात काही विद्यार्थी परीक्षेविषयी ताण-तणाव अनुभवतात याविषयीचे
एज्युकेशन थीम असलेले गाणे अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आले आणि अयोध्येतील
श्रीराम प्रतिष्ठापना निमित्ताने मेरे चौकट पे राम आये है हे गीत या शालेय
विद्यार्थी विद्यार्थिनींनी अत्यंत सुंदरतेने सादर केले त्यानंतर मंगळागौर गीत
विद्यार्थ्यांनी सादर केले.
*आर्मी गीताला प्रतिसाद;
धोंडेनी कार्यक्रमांचा आस्वाद
घेतला!*
आर्मी गीत राधे राधे हे राधा कृष्णा वर आधारित समूहनृत्य त्यानंतर देवी
लखाबाई गीत आणि या अत्यंत सुंदर अशा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमाचा शेवट
विद्यार्थ्यांनी गायलेले आर्मी गीत अत्यंत प्रेक्षणीय ठरले या संपूर्ण कार्यक्रमाला
विद्यार्थ्यांनी पालकांसह असंख्य रसिक प्रेक्षकांनी दाद दिली.या स्नेहसंमेलनाच्या
शुभारंभापासून ते शेवटपर्यंत संस्थेचे संस्थापक माजी आमदार भीमराव धोंडे त्यांच्या
पत्नी सौ.दमयंती धोंडे या संपूर्ण कुटुंबीयांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत या
का स्नेहसंमेलनातील विद्यार्थ्यांनी केलेल्या कलागुणांच्या प्रदर्शनाचा आस्वाद घेऊन
त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. या अत्यंत सुरेल आणि सुरेख संगीत कार्यक्रमाची
सांगता झाली.
0 टिप्पण्या