आष्टी शहरातील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या गैरहजेरीवरुन आमदार आजबे माजी
आमदार दरेकर यांंच्यात वादावादी आष्टी शहरात असणा-या सर्वच शासकीय कार्यालयातील
अधिकारी,कर्मचारी विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी ,इंजिनिअर, कर्मचारी
सतत गैरहजर राहतात.या बाबीवरुन हे हरामखोर कर्मचारी कार्यालयात हजर राहत नाहीत.याला
आळा लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार म्हणुन तुमची जबाबदारी आहे, तुम्हीच गैरहजर व
कामचुकार अधिका-यांची पाठराखण करु नका असे स्पष्ट मत जाहिर बैठकीत माजी आ. साहेबराव
दरेकर यांनी व्यक्त करताच आपण कुणाचं ऐकूण घ्यायला मोकळे नाहीत.तुमचे जे प्रश्न
आहेत ते तहसिलदारांसमोर मांडा,अधिका-यांना शिवीगाळ करू नका असे सुनावत आमदार
बाळासाहेब आजबे भडकले. आपण अधिकारी


,
कर्मचारी यांची बाजू घेत नाहीत तर ख-या
परिस्थितीची माहिती घेऊनच जबाबदारीने आपण बोलतो असे आ.बाळासाहेब आजबे यांनी
सुनावले. आष्टी येथील तहसिल कार्यालयाचे शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे
आयोजित बैठकीत वादावादी, हमरा तुमरी झाली. मुख्य कार्यालयीन प्रमुख गैरहजर
राहिल्याने माजी आ.साहेबराव दरेकर यांनी आपला पारा चढवत हे हारामखोर अधिकारी काम
करत नाहीत,मुख्यालयी थांबत नाहीत,पंचायत समिती, कृषी विभाग,तलाठी हे काम करत
नसल्याच्या आरोप करत या कामचुकार अधिका-यांना लोकप्रतिनिधी या नात्याने तूम्ही लक्ष
देण्याची गरज असतांना आमदार साहेबच या कामचुकार कर्मचा-यांना पाठिशी घालत असल्याचा
आरोप करताच आमदार बाळासाहेब आजबे यांनीही आपण कुणाचेही ऐकूण घ्यायला मोकळे
नाही,माझे प्रत्येक कार्यालयात लक्ष आहे.परंतु ब-याच कार्यालयात कर्मचा-यांची
संख्या कमी झाल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे आ.बाळासाहेब आजबे सांगत होते.या
बैठकीस माजी आ. भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,सतीशआबा शिंदे,आण्णासाहेब
चौधरी,पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस,ॲड.वाल्मिक निकाळजे, ॲड.साहेबराव म्हस्के,विजय
गोल्हार , बलभीमराव सुंबरे व्यापारी,पत्रकार, वकील,डॉक्टर व नागरीक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
0 टिप्पण्या