Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीत विधानसभा नमो चषक व चांदीची गदा पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांनी पटकावली तर मॅरेथॉन स्पर्धेत अंकुश टकलेने प्रथम क्रमांक पटकावला.

*विधानसभा केसरी व चांदीची गदा पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने तर नमो चषक मॕरेथाॕन स्पर्धा सांगलीच्या अंकुश टकलेने जिंकली*
------------------------------- फोटो ------------------------------- आष्टी(प्रतिनिधी) आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या विधानसभा केसरी व चांदीची गदा तर नमो चषक मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन २६ जानेवारी रोजी येथील भगवान महाविद्यालयाच्या प्रांगणावर करण्यात आले होते.विधानसभा केसरी नमो चषक व चांदीची गदा पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांनी पटकावली आहे.या दोन्ही स्पर्धेला महाराष्ट्रातील नामवंत धावपटू व कुस्तीपटूंनी आपला सहभाग नोंदवून या स्पर्धांमध्ये रंगत वाढवली.सकाळी ९ वाजता महाविद्यालयाचे प्रांगण ते पोखरीफाटा या दरम्यान आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अनेक नामवंत धावपटूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक सांगली येथील धावपटू अंकुश टकले याने पटकावला. त्यासाठी १५ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते ११ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक सोलापूर येथील अरुण राठोड याने पटकावले तर ७ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक नांदेड येथील विष्णू लव्हाळे या धावपटूने पटकावले.या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुलींनीही उत्स्फूर्तपणे आपल्या सहभाग नोंदवला होता मुलींच्या गटामध्ये शकुंतला गरजे प्रथम ललिता मेहत्रे द्वितीय तर संध्या कोल्हे यांनी तृतीय क्रमांक मिळवून स्पर्धेत रंगत वाढवली.स्पर्धेनंतर लगेच मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.कुस्ती स्पर्धेमध्ये कुमार गट, खुला गट आणि ओपन गट असे गट ठेवण्यात आलेले होते.खुल्या गटामध्ये मानाची गदा,मानाचा पट्टा व रोख ५१ हजार रुपये पटकावले आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मल्ल पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने अनेक प्रेक्षणीय लढती करून प्रतिस्पर्धी मल्लांना चितपट करून कुस्तीप्रेमी रसिकांची मने जिंकली.अंतिम लढतीमध्ये त्याने आष्टीच्या पैलवान सौरभ काकडे याचा पराभव केला,पैलवान सौरभ काकडे याला ३१ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक व नमा चषक देण्यात आला. तर या गटामध्ये २१ हजार रुपये व चषक असे तिसरे बक्षीस बालाजी खरात याने पटकावले.या कुस्ती स्पर्धांना १२ वा. वाजता सुरुवात झाली कुमार गटातील यास कुस्त्यांनी स्पर्धेची सुरुवात झाली. ३८ किलो वजनी गटामध्ये अजित तोडकर प्रथम तर गौरव सायकड याने द्वितीय क्रमांक पटकावला. ४८ किलो वजनी गटामध्ये शुभम कांबळे प्रथम कार्तिक मेंढाळकर द्वितीय आला.५५ किलो गटामध्ये मोहम्मद कुरेशी प्रथम तर शुभम कारले यांनी द्वितीय क्रमांक पटकावला ६५ किलो वजनी गटामध्ये महेश खांडेकर प्रथम तर अभिषेक टकले यांनी द्वितीय क्रमांक मिळवला ६६ ते ८६ वजनी गटामध्ये सुनील पोकळेने ५ हजार रुपयांचे प्रथम बक्षीस व चषक तर रोहन टेहळेने ३ हजार रुपयांचे रोख बक्षीस व चषक पटकावला.या प्रत्येक वजनी गटामध्ये दोन बक्षीस ठेवण्यात आलेली होती २ हजार रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत पहिले तर दीड हजार रुपयांपासून ३ हजार रुपयांपर्यंत दुसरे बक्षीस आणि प्रत्येक स्पर्धकाला चषक देण्यात आला.खुल्या गटामध्ये ५७ किलो प्रथम विश्वास तावरे ५ हजार रुपये द्वितीय मनीष मोहिते तीन हजार रुपये ६५ किलो वजनी गटांमध्ये प्रथम साहिल सय्यद ६ हजार रुपये तर द्वितीय बाळासाहेब चौरे ३ हजार रुपये ७४ किलो वजनी गटामध्ये प्रथम सौरभ जाधव ७ हजार रुपये तर द्वितीय रमेश चव्हाण ४ हजार रुपये खुले गटातील ८६ किलो या शेवटच्या वजनी गटामध्ये प्रथम धुळाजी वीरकर ८ हजार तर द्वितीय अमोल दिंडे ५ हजार अशा प्रकारची मल्लांनी बक्षिसे पटकावली सर्व गटातील सर्व विजेत्या मल्लांना रोख बक्षिसाबरोबरच नमो चषक ही देण्यात आला.स्पर्धा संपल्यानंतर रात्री १२ वाजता या स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आ.भीमराव धोंडे ,विठ्ठलराव बन्सोडे , महाराष्ट्र केसरी सईद चाऊस ,हरिभाऊ जंजीरे, पत्रकार उत्तम बोडखे , विजय गोल्हार ,अजय धोंडे ,बाळासाहेब आवारे, राजेंद्र धोंडे,अभय धोंडे , प्राचार्य डाॕ.दत्तात्रय वाघ, चेअरमन बाळसाहेब शिंदे,बाळासाहेब शेंदुरकर आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. *दरवर्षी स्पर्धा घेऊ; मल्लांना कौशल्य दाखवण्याची संधी देऊ -माजी आ.भीमराव धोंडे* बक्षीस वितरणानंतर या स्पर्धेविषयी बोलताना माजी आमदार शिक्षणमहर्षी भीमराव धोंडे यांनी सांगितले की, प्रत्येकवर्षी अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात या स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल आणि मल्लांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी देण्यात येईल. *स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद; क्रीडा रसिकासह मान्यवरांची उपस्थिती* ----------------- या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी या स्पर्धेचे संकल्पक व मार्गदर्शक शिक्षण महर्षी माजी आमदार भीमराव धोंडे हे आपल्या कार्यकर्त्यासह पहिल्या कुस्तीपासून ते शेवटच्या मानाच्या गदेच्या लढतीपर्यंत मैदानावर उपस्थित राहून कुस्तीचा आनंद घेत होते.तब्बल १२ तस कुस्त्या सुरु होत्या.मल्लांचा उत्साह वाढवत होते. त्यांच्या समवेत शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक विठ्ठल बनसोडे, हरिभाऊ जंजिरे, जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, विजयकुमार गोल्हार युवा नेते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे बीड जिल्हा सरचिटणीस डॉ.अजय धोंडे,युवा नेते अभयराजे धोंडे,राजेंद्र धोंडे यांच्यासह आष्टी परिसरातील अनेक कुस्तीप्रेमी नागरिक मैदानावर या स्पर्धांचा आनंद घेत होते.या स्पर्धांचे भव्य आयोजन महाराष्ट्र भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, भगवान महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.सूर्यकांत धोंडे,प्रा.डॉ.बापू तोरडमल,क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.दीपक टेकाडे यांनी केले होते यांना भगवान महाविद्यालयातील व पंडित जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या