Ticker

6/recent/ticker-posts

युवक युवतींनी घरोघरी केले माता- पितांचे पूजन ---------------------------------------- दादेगांव येथे आयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठानिमित्त तरुणाईच्या उपक्रमांची वाहवा..

युवक युवतींनी घरोघरी केले माता- पितांचे पूजन ---------------------------------------- दादेगांव येथे आयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठानिमित्त तरुणाईच्या उपक्रमांची वाहवा. . ************************ आष्टी(प्रतिनिधी) सद्यस्थितीत हिंदुस्थानातील प्रत्येक राज्य जिल्हा गाव वाड्या वस्त्यासह देशभर श्रीरामाच्या पूजेसह विविध धार्मिक उपक्रमांची उस्फुर्त रेलचेल सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील दादेगाव रामाचे या गावात श्रीरामाच्या कार्यकर्तुत्वाला शोभेल असा उपक्रम राबवून संपूर्ण जिल्हा भरातून वाहवा मिळवली आहे. आष्टी तालुक्यातील दादेगाव रामाचे हे ऐतिहासिक प्राचीन मध्ययुगीन काळापासून विविध धर्म परंपरा जपणारे गाव. विविध जाती धर्म पंथातील या गावात विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक उपक्रम अत्यंत गुण्यागोविंदाने राबवली जातात. माणुसकी जतन ठेवताना आधुनिक विचारांची ही देन या गावाला असल्याने अनेक जण विविध क्षेत्रात उच्च स्थानावर पोहोचलेले आहेत.आष्टी तालुक्यातील दादेगांव रामाचे या गावातील सर्व रामभक्तांनी आयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा निमित्त तरुणांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. संपुर्ण गावातील युवक युवती आणि जनमाणसांनी आपआपल्या माता-पित्यांचे मनोभावे पुजन केले आहे. मंदार बुआ रामदासी यांनी या अनोख्या उपक्रमाबद्दल तरुणांचे अभिनंदन करुन कौतुक केले आहे.दरम्यान, ग्रामीण भागातील एका छोट्याशा गावात माणुसकीचा अखंड स्त्रोत या निमित्ताने पाहायला मिळाला आहे. ज्येष्ठांचा आदर सन्मान करण्याची या निमित्ताने असलेली त्यांची प्रथा कौतुकास पात्र ठरली आहे.यांचा आदर्श प्रत्येक गावाने घेऊन आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर्श आणि सन्मान करावा अशा भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या