(उत्तमराव बोडखे,आष्टी)
-----------------
आष्टी तालुक्यातील
कडा येथील स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक सुरु
झाली आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवार दि.१ जानेवारी रोजी
आ.सुरेश धस समर्थक आणि आ.बाळासाहेब आजबे समर्थक यांच्या दोन पॕनलमध्ये सरळ लढत
होण्याचे स्पष्ट झाले आहे.दैनिक झुंजारनेतामध्ये दि.२४ नोव्हेबर २०२३ आणि दि.९ डिसेंबर २०२३
या अंकात या पतसंस्थेची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणुक दोन पॕनमध्ये सरळ लढतीने
होईल अशा अशायाच्या दोन बातम्या प्रकाशीत केलेल्या होत्या.त्यामुळे आज सदिच्छा
शिक्षक आणि शिक्षक एकता पॕनलमध्ये सरळ लढत होत असल्याने दैनिक झुंजारनेताचा अंदाज
तंतोतंत खरा ठरला आहे.अनेक सभासद व उमेदवारांनी झुंजारनेताचे अभिनंदन करुन कौतुक
केले.स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेची निवडणुकीत सदिच्छा शिक्षक आणि शिक्षक एकता
पॕलमध्ये सरळ लढत होत आहे.ही लढत तुल्यबळ होण्याची चिन्हे असल्याचा जाणकारांचा
अंदाज आहे. बीड जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेतर्फे या पतसंस्थेचा निवडणुकीचा
कार्यक्रम जाहीर झाला आहे.पतसंस्थेचा कारभार मोठा असल्याने ही निवडणूक महत्त्वाची
मानली जात आहे.या निवडणुकीत शिक्षकांच्या संघटना सक्रिय झाल्याने निवडणुकीला
चांगलाच रंग व वेग आला आहे.स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या १७
जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे.एक हजार मतदार मतदान करणार आहेत.पतसंस्था
निवडणुक मतदान दि.१४ जानेवारी २०२४ रोजी आष्टी व कडा या दोन केंद्रावर होणार
आहे.त्याच दिवशी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाईल असे निवडणूक निर्णय अधिकारी
बी.एम.राऊत यांनी सांगीतले.
या पतसंस्थेच्या निवडणूकीत
सर्वसाधारण प्रतिनिधी १२,अनु जाती,जमाती प्रतिनिधी १,महिला प्रतिनिधी २,इतर मागास
वर्गीय प्रतिनिधी १,भटक्या विमुक्त जाती प्रतिनिधी १ असे एकूण १७ संचालकांच्या
निवडीसाठी निवडणूक होत आहे.
सदिच्छा पॅनल अधिकृत उमेदवार
---------------------
विद्दमान चेअरमन मारुती पठाडे,विद्दमान संचालक महेशकुमार शिंदे,हिरामण पोकळे,शिंदे
विठ्ठल,आप्पासाहेब काळे,करडुळे नितीन,मेहकर प्रवीण,लटपटे अशोक,खाडे चंद्रशेखर,काळे
संजय,शेख सलीम,वाणी रावसाहेब (सर्वसाधारण मतदार संघ),पोपट बोराडे (अनुसूचित जाती
प्रतिनिधी),आदिनाथ गर्जे (भटक्या विमुक्त जाती प्रतिनिधी),गोरक्ष गोरे (इतर मागास
प्रतिनिधी),श्रीमती होळकर मनीषा,श्रीमती शैला सातपुते (महिला प्रतिनिधी) यांचा
समावेश आहे.
शिक्षक एकता पॕनलचे
आधिकृत उमेदवार
------------------
बाळासाहेब महाडिक,रत्नाकर चव्हाण,उमेश झांबरे,स्वानंद थोरवे,प्रशांत दगडे,साहेबराव
कोहोक, प्रमोद नरुटे,अशोक गाडे,देविदास भवर,संदीप औटे,कैलास शेकडे,श्रीमती तांबोळी
शमिमबानो (सर्वसाधारण मतदार संघ),सुर्वत गव्हाळे (अनुसूचित जाती) बाळु बन्सोडे (इतर
मागास प्रवर्ग) रामभाऊ घुले (भटक्या विमुक्त जाती),श्रीमती कौशल्या मांगडे,श्रीमती
लताबाई ढोबळे(महिला राखीव प्रवर्ग) यांचा समावेश आहे.आ.सुरेश धस आणि आ. बाळासाहेब
आजबे यांंच्या समर्थकांत ही तुल्यबळ अशी लढत होण्याचे चित्र आहे.
0 टिप्पण्या