

उत्तम बोडखे आष्टी.
--------------
समाजाला दिशा देण्याचे काम संतांनी केले.देव प्रत्यक्ष कोणाला दिसला जरी नसला तरी संतांनी अनुभवाद्वारे देवत्वाची प्रचीती समाजाला दिली आहे.समाजाला अध्यात्मिक मार्गावर ठेवून माझ्यामध्ये शांतता सौख्य राखण्याचे मोठे काम संतांनी केल्याचे दिसून येते.संत मदन महाराज यांनी देहाची कधीच पर्वा केली नाही.त्यांनी देहाचा लाड कधीच केला नाही.याचा साक्षीदार मी असल्याचे सांगून अनेक उदाहरणे देऊन जीवनातील गुरुचे महत्त्व पटवून सांगितले.परमार्थाला लगले असताना प्रतिबंध करणरे मानवाचे इंद्रिये असतात.परमार्थात आवस्था नसेल तर त्याला काहीच महत्त्व नाही.परमार्थाने जीवनात परवर्तन होत असते. काही माणसे काम,क्रोध,लोभ,मोह,व्देष अंध असतात.संसारात व्यवस्था तर परमार्थात आवस्था असते.कडा शहरात संत मदन महाराज पुण्यतिथी सोहळा हा दिवसेंदिवस भव्य दिव्य तर होत आहे.आता लोकमहोत्सव होऊ लागला असल्याचे प्रतिपादन संत मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांनी केले.
आष्टी तालुक्यातील कडा येथे वै.संत मदन महाराज बिहाणी यांच्या २७ व्या.पुण्यतिथीनिमित्त संत मदन महाराज संस्थान आवारात दि.२५ डिसेंबर ते १ जानेवारी २०२४ या कालावधीत रामकथा व हरिनाम सप्ताह संपन्न झाला.सोमवार दि.१ जानेवारी २०२४ रोजी काल्याचे कीर्तनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजीआ.भीमराव धोंडे, आ.साहेबराव दरेकर,
ॲड.चंद्रकांत आजबे,
बाबासाहेब गुंजाळ,
संपतराव म्हस्के,सरपंच युवराज पाटील,
श्रीनिवास महाराज आळंदी,ज्ञानेश्वर माऊली कराळे,निवृत्ती बोडखे महाराज,दिनकरराव तांदळे महाराज,मोहन महाराज आमटे,
दादा महाराज चांगुणे,
संतोष महाराज मोरे,बबन बळे,संजय महाराज हजारे,मगर महाराज,
हनुमानशेठ बिहाणी (बीड),मारुती वनवे (मुंबई),संजय गाढवे,बाजीराव हजारे,
तुकाराम भोसले,
पांडुतात्या झिंजुर्के,
विक्रम पोकळे,पत्रकार उत्तम बोडखे,रघुनाथ कर्डीले,बाबासाहेब मुळीक,अनिकेत चांगुणे,
विक्रम नरवडे आदि राजकीय,सामाजिक,
धार्मिक,शिक्षण,व्यापार क्षेत्रातील मान्यवरांसह ५० हजार भाविकांनी उपस्थिती होती.
यावेळी ह.भ.प.बबन महाराज यांनी
" हरिले माझे हरीले चित्त " या गौळणवर काल्याचे कीर्तन केले.यावेळी बहिरवाल महाराज म्हणाले की,गुरु जसे महत्वाचे असतात तसा शिष्यही महत्त्वाचा असतो म्हणून गुरुने आपल्या शिष्याबद्दलसुद्धा कृतज्ञता ठेवली पाहिजे.
जो गुरु शिष्याच्या भल्याचा विचार करतो तो खरा गुरु असतो.प्रत्येक गुरु हा शिष्यासाठी आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून चांगुलपणा शिकवत असतो.
संस्कारक्षम शिक्षणातून मानवी जीवनात समता,
शांतता,बंधुत्व या मूल्यांचा स्वीकार करून आदर्श मानवी जीवन जगण्यासाठी गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे असे गुरुबाबत सांगीतले.
समाज बदलत चालला आहे.आदर,प्रेम,
नातेसंबध यांची कमतरता होत आहे.
हिंदुस्थानातील श्रीराम या देवाने मातापित्याच्या आदेशाने वनवास भोगला.आई वडीलांच्या आदेशाने भगवान श्रीकृष्णाने गुरे राखली मात्र याच भारतभुमीत आईवडीलांना वृध्दाश्रम दाखविला जात आहे.
आईवडील दुःखी असतील तर तुम्ही कीतीही तिर्थयात्रा केली तरी त्या तिर्थयात्रेचे पुण्य त्यांच्या आश्रु मध्ये वाहुन गेल्याशिवाय राहणार नाही असे सांगीतले.
दानशुर माणसाला पुन्हा मानवाचाच जन्म मिळतो.
साधुसंत देवमान्य असतात,राजकारणी लोकमान्य असतात.
मर्यादित जीवन जगु नका,आपले जीवन विस्तारीत झाले पाहिजे.संत आणि भगवंत यांचेच ऐकायचे सर्वसामान्य माणसाचे ऐकायचे मात्र आचरण विचारपुर्वक करायचे. जीवनात बदल करणारे संत असतात.संतानी भक्ती केली आणि देवाने अनेक अवतार घेऊन चरित्र केले म्हणुन अलौकिक कार्य करणाऱ्यांचेच मग ते धार्मिक क्षेत्र असो अथवा सामाजिक क्षेत्र असो लोकहितासाठी झटणारे नेते असो अथवा देश पारतंत्र्यातुन स्वतंत्र करणारे राष्ट्रभक्त असो त्यांचे अलौकिक कार्य आहे.संत व देवाचे चरित्र असते.सामान्यांचे चरित्र नसते.संत,देव आणि अलौकिक कार्य करणाऱ्यांचेच चरित्र होत असतेअसेही महाराज यांनी यावेळी सांगीतले.
संत हेच समाजाचे सर्वश्रेष्ठ गुरु असतात.संत हे देव आणि समाजामध्ये दुवा निर्माण करतात.संत मदन महाराज बिहाणी यांनी निरलसपणे मार्गदर्शन करताना स्वतः उघडे राहुन समाजाला मायेची,भक्तीची ऊब दिली.त्यांनी स्वतः लग्न केले नाही पण हजारो लग्न लावून दिले,ते स्वतः उपाशी राहीले पण वसतिगृह सुरू करुन अनाथ मुलांना घास भरवला,त्यांनी देहाची पर्वा न करता परमार्थ केला.संत मदन महाराज बिहाणी यांंच्या अलौकिक सेवाकार्यामुळे चंद्र-सुर्य असेपर्यत समाज त्यांना विसरणार नाही असे शेवटी ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांनी सांगीतले.
0 टिप्पण्या