Ticker

6/recent/ticker-posts

मावळते चेअरमन इंजि.पी.ई.तळेकर (आप्पा) यांंच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुक अविरोध.

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील आष्टी येथील पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था म.या पतसंस्थेची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणुक मावळते चेअरमन इंजि.पी.ई.तळेकर (आप्पा) यांंच्या मार्गदर्शनाखाली अविरोध झाली आहे. या पतसंस्था मतदार संघातील सन २०२२-२०२३ ते २०२७- २०२८ या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या कालावधीसाठीच्या निवडणुकीकरीता महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणुक)नियम २०१४ च्या नियम ३२ ला अनुसरून निवडणुक अधिकारी तथा सहकार अधिकारी श्रेणी १ (सहकारी संस्था) बी.डी. फलके यांनी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी ११ संचालकांच्या जागांसाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणुक अविरोध झाल्याचे जाहिर केले.सर्वसाधारण मतदार संघातुन पुढील सहा संचालक अविरोध झाले. बेग असलम उल्ला जकीउल्ला,शेख अर्शद लतीफ,आंधळे बापूराव एकनाथ,सोनवणे विलास नवनाथ,कावदार भाऊसाहेब त्रिंबक,म्हस्के भाऊसाहेब संतराम,शहाणे सारीका बाबाराव, निकम राणी परशुराम (महिला राखीव), निकाळजे लक्ष्मण कुंडलिक (अनुसूचित जाती -जमाती) सायकड रोहीत दिलीप,(इतर मागासवर्गीय प्रवर्ग ),मासळकर सतीश हिरामण (बि.जा.भ.ज/विशेष मागास प्रवर्ग ) हे ११ संचालक अविरोध निवडले आहेत. ही निवडणुक अविरोध होण्यासाठी विद्दमान चेअरमन उपअभियंता पी.ई.तळेकर (आप्पा),व्हाईस चेअरमन राजाभाऊ सायकड आणि सचिव विलास सोनवणे आणि मावळते संचालक मंडळाने परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या