Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीत प्रत्येक वर्षी भव्यदिव्य कृषी प्रदर्शन भरविणार -----माजी आ.भीमराव धोंडे --------------------------- शेतकरी व नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात भीमराव धोंडे सतत आघाडीवर ---- ह.भ.प.विठ्ठल महाराज गहिनीनाथकर

आष्टी (प्रतिनिधी) डॉ.स्वामीनराधन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आष्टीत पहिल्यांदा आयोजित केले. या कृषी प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.यापुढे दरवर्षी भव्य दिव्य प्रमाणात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरविणार असल्याचे प्रदर्शनाचे स्वागताध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे यांनी जाहिर केले. आष्टीत कृषी प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी ते बोलात होते. यावेळी महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथगडकर,अजयदादा धोंडे,अभयराजे धोंडे,विठ्ठलराव बन्सोडे, अशोक साळवे, उपसभापती पांडुरंग नागरगोजे,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, आत्मचे साळवे, रविंद्र ढोबळे,राजेंद्र धोंडे,उत्तम बोडखे,शंकर देशमुख,सेवानिवृत्त पीएसआय शेख अन्सारभाई ,डाॕ.डी. बी.राऊत,प्राचार्य डाॕ. श्रीराम आरसुळ,बंडु पाचपुते,गणेश जठार सरपंच अभय गर्जे,सरपंच संजय विधाते , उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले की,जगातल्या ५० देशांना आपण मोफत गहू वाटतोय ईतके आपल्याकडे धान्य पिकते म्हणुनच आपल्या दिडशे कोटी लोकांना धान्य पुरत आहे.भारत देशामध्ये कुठल्याच राज्यात चार कृषी विद्यापीठे नाहीत. आपल्या महाराष्ट्रात आहेत.सर्वांना त्यांच्याकडुन अपेक्षा आहेत.त्यांनी नवीननवीन संशोधन करावे.भारत देशात उत्पन्न कसे वाढेल. यासाठी प्रयत्न करावेत.आपल्या शेतीवरचा खर्च कमी झाला पाहिजे.शेतीला लागणारे औषध बी-बियाणे यांच्या किंमती फार वाढलेल्या आहेत. आपल्या राज्यात गहू कमी पिकतो आपण दुसऱ्या राज्यातुन गहू आणतो आपण आमदार असताना कृषीमंत्री यांना सांगितले की, शेतीसाठी जे जे लागत त्यांच्यासाठी आयोग स्थापन करा. त्यांच्या किंमती कमी करा.उत्पादन खर्च कमी करून उत्पादन कसे वाढेल ? यावर कृषीखाते व आत्मा यांनी प्रयत्न करावेत.हमी भाव वाढवावा लागेल तरच आपल्याला शेती परवडेल. सर्व अन्नधान्य यांना ४० वर्षांपूर्वीचा भाव हा आज यात थोडासा वाढला आहे पण शेतीवरील सर्व प्रकारच्या वस्तूच्या किंमती‌ फार वाढलेल्या आहेत. त्यावेळी ट्रॅक्टर १५ हजाराला येत होता. आता १० लाख रुपये किंमत झाली आहे.धान्य यांची किंमत मात्र थोडी वाढली आहे.शेतकरी यांच्या पुढे असंख्य अडचणी आहेत.त्या अडचणीला शेतकरी यांना तोंड द्यावे लागते जगात १२ देशात कांदा पिकतो. तो २०० देशांना पुरवला जातो. मागच्यावर्षापासून आपण कृषी प्रदर्शन घ्यावा की नाही वाटत होतं,आपल्या भागात किती प्रतिसाद मिळतो हे वाटत होते पण आपल्या भागातुन या प्रदर्शनाचा दोन लाख शेतकरी, नागरिक व विद्यार्थी यांनी भेट दिली प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. यापुढे प्रत्येक वर्षी आपण कृषी प्रदर्शन आयोजित करणार आहोत. मलासुध्दा आता दोन तीन दिवस करमणार नाही कारण मी चार दिवस सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कृषी प्रदर्शनस्थळी स्वागत कक्षात बसत होतो. येणाऱ्या शेतकरी , नागरिक याचे स्वागत करीत होतो.या प्रदर्शनात बीड,अहमदनगर,आष्टी,पाटोदा,शिरूर,कर्जत, जामखेड,भुम,उस्मानाबाद,करमाळा, मिरजगाव,श्रीगोंदा,पाथर्डी येथील लाखो शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांंनी भेटी दिल्याचे सांगीतले. यावेळी बोलतांना महंत ह.भ.प‌.विठ्ठल महाराज म्हणाले की,माजी आ.भीमराव धोंडे यांनी कालेज जीवनापासून संघर्ष केला.भीमराव धोंडे यांनी आष्टी ते बीड,आष्टी ते दिल्ली,आष्टी ते मुंबई पायी मोर्चे हे शेतकऱ्यांचे प्रश्नांसाठी काढले. धोंडे हे सतत आष्टी तालुक्यातील शेतकरी व नागरिक यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करतात. त्यांना शंकराचे अवतार संत वामनभाऊ यांचा आशीर्वाद आहे.चार दिवसांत दोन लाख लोकांनी हे प्रदर्शन पाहीले.धोंडे हे दहा लाख लोकांपर्यंत पोहचले आहेत असे मला वाटते. भीमराव धोंडे यांची सतत शेतकऱ्यांच्याबद्दल तळमळ असते ते सतत काही ना काही शेतकऱ्यांसाठी करत असतात.यावेळी छत्रपती शाहु,फुले,आंंबेडकर कृषी महाविद्यालयाच्या वतीने कृषी प्रदर्शनाचे स्वागताध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.श्रीराम आरसुळ,प्रशासन अधिकारी डॉ.डी.बी. राऊत, सर्व प्राध्यापकांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.श्रीराम आरसुळ यांनी तर सुत्रसंचलन प्रा.एल. एस.मिसाळ एल आणि प्रा.पी.आर.काळे यांनी तर प्रा.एल.एस. मिसाळ यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या