Ticker

6/recent/ticker-posts

संतकृपेने माणसाचा उध्दार होतो ----- महंत काशीनाथ महाराज

आष्टी (प्रतिनिधी) प्रपंच हा भास असतो.मृगजळ म्हणजे संसार असतो.संसारात गुरफटु नका.संसारात राहुन परमार्थ करा.संसारासाठी वेडे होऊ नका.देवासाठी वेडे व्हा.देव अविनाशी आहे.अविनाशी परमात्मा आपल्याला अविनाशी करतो.देव भक्ताला आपल्यासारखे करतो.आपण प्रपंचाकरीता भक्ती करतो तर संत देवासाठी भक्ती करतात.चित्ताशिवाय परमार्थ व्यर्थ आहे.पांडुरंगासारखे सुखरुप दैवत नाही.आपल्याला सुखाचा पत्ता संत देतात.परंतु आपण संताकडे जात नाहीत.पैशात,संसारात सुख नसते,प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत.लग्न झाल्यावर, मुलबाळं झाल्यावर सुख मिळेल असे वाटते.धन कधीच सुख देत नसते.हे वास्तव आहे.गरीब माणुस सुखी असतो तर श्रीमंत सुखी नसतो.संत,महात्मे अमर होतात अजरामर होतात,कीर्तीमान होतात.संत कृपेने माणसाचा उध्दार होतो असे प्रतिपादन ह.भ.प.महंत काशीनाथ महाराज नागतळा यांनी केले.आष्टी येथील सुभाष शेकडे,डाॕ.राजेंद्र शेकडे आणि ॲड.बाळासाहेब शेकडे यांंच्या मातोश्री आणि ॲड.कै.हरिचंद्र शेकडे (आण्णा) यांंच्या पत्नी कै. कुसुमबाई शेकडे यांंच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित हरिकीर्तनात ते बोलत होते. यावेळी माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले की, हरिचंद्र शेकडे आण्णा हे माझे खरेखुरे मार्गदर्शक होते.आण्णा नामांकीत वकील होते.मी राजकारणात प्रवेश करताना ते मला म्हणत होते की,एलएलबी पुर्ण कर आणि मगच राजकारणात ये...त्यांचे सल्ले आपण नेहामी घेत होतो,राजकारणात मला त्यांची साथ लाभली. शेकडे आण्णाचा मी सतत आदर करत असे, ते माझे मार्गदर्शक होते असे धोंडे यांनी यावेळी सांगीतले.यावेळी आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.भीमराव धोंडे,युवानेते जयदत्त धस,भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड.साहेबराव म्हस्के, समाजसेवक विजय गोल्हार,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी,लालाभाऊ कुमकर,चेअरमन आदिनाथ सानप,अशोक साळवे,रामदास डोरले महाराज,ॲड.रत्नदीप निकाळजे, विष्णूपंत वायभासे,बबन बळे,अशोक बळे,ॲड.चंद्रकांत शेकडे,सुर्यकांत शेकडे,एन.टी.गर्जे,पत्रकार उत्तम बोडखे, बाळकृष्ण राऊत,किसन जगताप,बाबु कदम,पिराजी तवले,लालाराक्षे महाराज,संतोष मुरकुटे,ॲड.बाळासाहेब मोरे,कैलास शेकडे, आण्णासाहेब लांबडे,महादेव कोंडे,सदाशिव दिंडे,सुरेश गोरे,अशोक लटपटे,भोगाडे महाराज,बाजीराव गोरे,नानासाहेब तवले आदि सामाजिक , राजकीय,धार्मिक,विधी न्याय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाजीराव गोरे सर,ह.भ.प.रामदास डोरले महाराज,ॲड. रत्नदीप निकाळजे,अशोक साळवे,पत्रकार उत्तम बोडखे,समाजसेवक विजय गोल्हार,आण्णासाहेब चौधरी,चेअरमन आदिनाथ सानप,भाजप तालुकाध्यक्ष ॲड.साहेबराव म्हस्के,
जयदत्त धस,माजी आ.भीमराव धोंडे यांनी श्रध्दांजली अर्पण केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या