आष्टी (प्रतिनिधी)
मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण अस्वस्थ झालेला असून या प्रश्नाची दाहकता बीड पुरती मर्यादित राहिली नसून याची दाहकता पसरण्याअगोदर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी विधान परिषदेमध्ये मराठा आरक्षण या विषयावरील चर्चेमध्ये बोलताना केले.
ते पुढे म्हणाले,मराठा आरक्षण विषयामुळे समाज मन अस्थिर झालं आहे.याची दाहकता मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात जास्त आहे.
छत्रपती संभाजीनगर सोडता मराठवाड्यात उद्योग नाहीत,साखर कारखानदारी हवी तशी चालत नाही,बहुतांश मराठा शेतकरी अल्पभूधारक असून पावसाच्या अनियमित्येमुळे शेतीतील उत्पन्न कमी झालेले आहे.त्यामुळे रोजगारासाठी ऊसतोडणी आणि वीटभट्टी सारख्या कामावर जाण्यासाठी मराठवाड्यातून सर्वाधिक स्थलांतर होतंय असे सांगून ते पुढे म्हणाले की,ऊसतोडी

मधे बंजारा समाजानंतर सर्वाधिक मराठा समाजाचे बांधव आहेत.२३ मार्च १९९४ च्या शासन निर्णयावेळी मराठा समाजाचा विचार का गेला नाही? याचीही चर्चा आज होण्याची आवश्यकता आहे असे सांगून ते म्हणाले की
देवेंद्र फडणवीस यांनी मागासवर्गीय आयोग पुनर्गठित केला.
२९-११-२०१८ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत १६ टक्के आरक्षण दिले आहे हे विसरता येत नाही.बीड मधे घडलेल्या हिंसेचा सर्वात आधी मी विरोध केला.सोशल मीडियावर सगळ्यात अगोदर यावर प्रतिक्रिया दिली होती.त्यावेळी सर्वपक्षीय आणि सर्व जातीच्या नेत्यांचे घरे जाळली गेली.यामध्ये कोणताही भेदभाव न करता या १६ ते २१ वयोगटातील बेरोजगार तरुणांनी मराठा समाजातील नेत्यांना देखील लक्ष केले होते.यामध्ये विशिष्ट जातींना लक्ष करण्यात आले नव्हते हे दिसून आल्याचेही सांगून ते पुढे म्हणाले की,त्या काळात नेत्यांना गाव बंदी असल्याने मला स्वतःला सख्या मित्राच्या आईच्या दहाव्याला देखील जाता आलं नाही याची खंत वाटते.मराठा समाजाला राजकीय आरक्षण नको,फक्त शिक्षण आणि नोकरीत मधे आरक्षण द्या… याचबरोबर धनगर समाजाला देखील त्यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण देण्यासाठी सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य समोरील हा प्रश्न तात्काळ निकाली काढावा अशी मागणी करत अतिशय स्पष्ट शब्दात आ.सुरेश धस यांनी विधानपरिषद आपले विचार मांडले.
0 टिप्पण्या