Ticker

6/recent/ticker-posts

४० वर्षे राजकारणात प्रमाणिक राहुन काम करणारे चेअरमन सय्यद खाजाभाई ------------------- माजी आ.भीमराव धोंडे यांची निष्ठावान पण गरीब कार्यकर्त्यांची फळी !

आष्टी (प्रतिनिधी) राजकारण म्हटलं की छोट्या मोठ्या पदापासूनच प्रचंड आर्थिक माया जमवून बलदंड होण्याची नामी संधी असे साधारण समीकरण समाज व्यवस्थेमध्ये रूढ आहे परंतु अशा या बदनाम झालेल्या राजकारणातसुद्धा केवळ बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते प्रमाणिक असल्याचे दिसून येत आहे. यात आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शिक्षण महर्षी भीमराव धोंडे यांचे कट्टर कार्यकर्ते आणि आष्टी दूध संघाचे माजी चेअरमन सय्यद खाजाभाई हे एक आहेत.यांच्या घरावरचे ४० वर्ष राजकारणात राहून सुद्धा पत्रे सुद्धा बदलता आलेले नाहीत.ही वस्तुस्थिती आहे.आष्टी दूध संघाचे माजी चेअरमन सय्यद खाजाभाई (वय ७२) हे १९८० पासून माजी आमदार भीमराव धोंडे यांचे कट्टर समर्थक आणि धोंडे यांंच्या विचारांना वाहून घेणारे कार्यकर्ते राहिले.आष्टी दूध संघाचे सलग १५ वर्षे संचालक म्हणून त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कार्य केले.एवढेच नव्हे तर पाच वर्ष व्हाईस चेअरमन आणि पाच वर्ष थेट चेअरमनपदाची माळ त्यांच्या गळ्यात होती.एवढी सारे पद,वैभव असतानाही त्यांनी कसलेही आर्थिक बलदंड होण्या
ची संधी कधीच घेतली नाही.एक निष्ठावान प्रमाणिक कार्यकर्ते होणे यातच त्यांनी धन्यता मानली.तब्बल ४० वर्ष या पदावर राहून सुद्धा आणि राजकारणात असतानाही आजही त्यांचे घर पत्र्याचे आहे.घरावरचे पत्रे सुद्धा बदलू न शकणारा अत्यंत दुर्मिळातला दुर्मिळ कार्यकर्ता आज मिळणे मुश्कील आहे.अशा अवस्थेत माजी आमदार भीमराव धोंडे यांचा हा कार्यकर्ता राजकारणात एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून बदनाम झालेल्या राजकारणाला नवी उभारी देणारा ठरू शकेल? काल आष्टी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष ह.भ.प.दिनकरराव तांदळे आणि जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी चेअरमन सय्यद खाजाभाई यांची दौलावडगांव येथे सदिच्छा भेट घेतली.यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला.जुन्या काळातील अनेक चित्तथरारक प्रसंग चेअरमन सय्यद खाजाभाई यांनी यावेळी सांगीतले. चौकट -------- माजी आमदार भीमराव धोंडे हे शांत संयमी,अभ्यासू आणि प्रमाणिक राजकारणी आहेत.शैक्षणिक संस्था उभारून त्यांनी आष्टीसारख्या ग्रामीण भागात ज्ञानाची दरवाजे उघडी केली.विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी विकासाची गंगा आणली त्यांच्या या विकास कार्यात स्वतःला एक धागा बनता आले याचे समाधान आहे.आदर्श राजकारणी म्हणून त्यांची वेगळी प्रतिमा आहे. - सय्यद खाजाभाई ( माजी चेअरमन,आष्टी दूध संघ ) ---------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या