Ticker

6/recent/ticker-posts

२५ प्रदर्शनात आकर्षण ठरलेला सहा वर्षाचादिड टनाचा गजेंद्र रेडा

आष्टी(प्रतिनिधी) राज्यातील शेतकऱ्यांसाठी आष्टी येथे चार दिवशीय डाॕ.स्वामिनाथन् राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन होत आहे.हे कृषीविषयक प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी आनंद पर्वणी ठरत आहे.या प्रदर्शनाचे रविवार बीडच्या खासदार डाॕ.प्रीतमताई मुंडे आणि राज्य कृषिमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांचे हस्ते उद्घाटन झाले. आष्टीत होणाऱ्या चार दिवशीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा शेतकरी मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत.प्रदर्शनाचे मुख्यसंयोजक माजी आ.भीमराव धोंडे असुन या कार्यक्रमास आ.सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.साहेबराव दरेकर,ॲड वाल्मिकतात्या निकाळजे,ॲड.साहेबराव म्हस्के,अशोक साळवे,विजय गोल्हार,भाऊसाहेब लटपटे,कुलगुरु इंद्र मणी यांंच्यासह ,उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे,तहसिलदार प्रमोद गायकवाड,राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.आष्टी तालुक्यात प्रथमच डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन दि.२४ ते २७ डिसेंबर २०२३ चार दिवसांच्या कालावधीत आहे.आष्टी शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयासमोर नगर-बीड रोड,आष्टी येथे भव्य दिव्य मैदानावर होत आहे. *गजेंद्र रेडा ठरतोय मुख्य आकर्षण* ****************** रोज १५ लिटर दूध, ३ किलो सफरचंद, ४ किलो पेंड,३ किलो पीठ,ऊस, वैरण,वाडे असा खुराक असलेला दीड टन वजनाच्या हिंदकेसरी गजेंद्र रेडा कृषी प्रदर्शनांमध्ये आकर्षण ठरत आहे.२५ प्रदर्शनात तीन लाख लोकांनी हा गजेंद्र रेडा पाहून कुतूहल व्यक्त केले. महाराष्ट्रासह,कर्नाटक येथे आजवर झालेल्या २५ वेगवेगळ्या प्रदर्शनात प्रमुख आकर्षण ठरलेला गजेंद्र बीड जिल्ह्यातील आष्टीतील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात दाखल झाला आहे.बेळगाव जिल्ह्यातील काकळवाड मंगसुळी येथील ज्ञानदेव विलास नाईक यांनी काही वर्षांपूर्वी पंजाब येथून एक म्हैस दीड लाख रुपयाला खरेदी केली होती.तिला हा जन्मलेला गजेंद्र रेडा आहे.आज तो सहा वर्षांचा झाला असून त्याला संभाळण्यासाठी कुटुंबातील तीन व्यक्ती दिवसरात्र राबतात.या गजेंद्रसह आमच्या घरी ५० म्हशी दररोज २०० लिटर दूध आहे. गजेंद्रने आजवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक उन्नती करून दिली आहे.भविष्यातदेखील त्याला मोठी मागणी आहे.तो विक्री करणार नसून लोकांना पाहण्यासाठी आकर्षण म्हणून कायम सांभाळ करणार असल्याचे रेड्याचे मालक ज्ञानदेव नाईक यांनी सांगितले.हा रेडा कसा आहे हे पाहण्यासाठी नेहमी गर्दी होते.त्याला पाहताना त्याची अनेकवेळा बोलीदेखील झाली.२५ लाख रुपयाला मागितले आहे.पण तो विकायचा नाही.हरियाणात त्याची जवळपास ३ कोटी रुपये किंमत होईल.गजेंद्रचा नावलौकिक झाला आहे.भविष्यात लोकांचे आकर्षण कायम ठेवण्यासाठी त्याचा सांभाळ करणार असल्याचे नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या