Ticker

6/recent/ticker-posts

बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी आष्टीचे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन गाजले! ---------------------------------------- युवा कलावंतांच्या अदाकरिला आष्टीकरांची साद ; माजी आ.धोंडे यांंच्याकडून कौतुक

आष्टी (प्रतिनिधी) संगीताचा प्रचंड सुंदर बाज.. डिजीटल संगीताची मिळणारी साथ..आणि महाविद्यालयीन युवकांच्या थरकणाऱ्या पायांची व्यासपीठावरील सुंदर नृत्याची अदाकारी यामुळे आष्टीकरांच्या चार दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात सांस्कृतिक कार्यक्रमांनी बहार आणली..यंदा बीड जिल्ह्याच्या आष्टी येथे शिक्षण महर्षी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या अथक परिश्रमातून आणि विविध नेते अधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संयोगातून दि. २४ ते २७ डिसेंबर या चार दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात विविध कृषीविषयक पशुपक्षी प्राणी यांच्या वैविध्यपूर्ण पाहणी समवेत हजारो शेतकऱ्यांना ज्ञानात भर पडली. या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन अनेकांनी सहभाग नोंदवला तर आष्टी तालुक्यासह बीड जिल्हा आणि मराठवाड्यातील कृषी प्रेमी शेतकऱ्यांनी आवर्जून सहभाग नोंदवत उत्सुकतेने पाहणी केली.आज मंगळवारी आष्टी येथील महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्राच्या युवक युवतीनी अत्यंत सुंदर गीत गायनातून नृत्याचे सादरीकरण केले.या सुंदर संगीताचा बाज असलेल्या हार्मोनियम आणि तबला,ढोलकीच्या थिरकणाऱ्या बोटातून निर्माण झालेल्या संगीताच्या तालावर अक्षरशः मान डोलत सर्वांनी प्रतिसाद दिला.एकूणच,मोठ्या परिश्रमातून उभारलेल्या सुंदर मंचावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन यशस्वी झाल्याच्या भावना सामान्य शेतकरी आणि कृषी प्रेमी मान्यवरांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.दरम्यान या तीनही दिवशी आष्टी येथे कृषीविषयक दिवाळी साजरी झाल्याचा अक्षरशः भास झाला..यातून शेतीविषयक ज्ञानाबरोबरच आवड निर्माण होण्यात या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची उपयोगिता झाली असे म्हटले तर वावगे ठरू नये अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत.यावेळी शिक्षण महर्षी आष्टी पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सहभाग नोंदवणाऱ्या आणि आपल्या कलागुणांनी उपस्थितिताना प्रचंड आनंद दिला.संगीताची पर्वणी देणाऱ्या युवक युवती कलावंतांना धन्यवाद देत मनापासून कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या