

विशेष लेख
************
बाबासाहेब पिसोरे,आष्टी.
गेली दोन दिवस अनेक शेतकऱ्याचे कांदा पिकाबद्दल आणि विशेष
म्हणजे कांदा दराबद्दल सारखी विचारणा होत आहे.विषय असा असतो, आज सर्वत्र कांदा ८० रू.भावाने विकला जात आहे हे भाव किती दिवस टीकतील? केंद्र सरकारणे यापूर्वी ४० टक्के निर्यात शुल्क आकारले आहे.काल मध्यरात्री परत ८०० अमेरिकन डॉलर ( एमएपी)
(मिनीमम एस्पोर्ट पाईज) वाढवले आहे. म्हणजे ८०० द ९४ -६७२०० आणि इतर टॅक्स जोडला तर एका टनाला ७०.००० रूपये अगोदर सरकारला टॅक्स पेड करावा लागतो. मगच कांदा खरेदी करायचा.आता अशावेळी कुठलाही देश तुमचा कांदा खरेदी करणार नाही अर्थात ही निर्यात बंदीच म्हणावी लागेल त्यामुळे निर्यातदार व आयातदार यांचे करार तुटले.दोघाचे अतिनुकसान झाले याचे सरकारला देणे-घेणे नाही.आता केंद्र सरकार म्हणते, आम्ही ४ लाख टन कांदा खरेदी केलेला आहे आणि तो २५ रूपये किलो दराने विकत आहोत.ही निव्वळ थापाबाजी आहे त्यानी जरी कांदा खरेदी केलेला असता तरी तो आज नक्कीच नाही आणि असेल तर सुस्थित नाही तेव्हा थोडाफार कांदा शेतकरी बांधवाकडे कांदा चाळीत आहे त्यांचे पुढे अनेक प्रश्न उभे आहे. सरकारने दाखवलेल्या भितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तेव्हा यासर्व विषयाला अनुसरून मी आपणासमोर मला जे वाटते ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
पहिला प्रश्न कांद्याचे भाव गडगडतील का? तर मित्रहो नक्कीच भाव कमी होणार नाहीत. कांदा दिवाळीपर्यंत
शंभरी गाठेल यांची मला खात्री आहे.याचे कारण असे आहे की,
पसरकारणे जरी शेतकऱ्या विरूध्दात कठोर पाऊल उचलले असले तरी त्यांचा काहीही उपयोग होणार नाही.निर्यात पुर्ण पणे बंद झालेली असली तरी देशा अतंगत रोज ५५ ते ६० हजार टन कांदा खाण्यासाठी लागतो. बाकी प्रक्रीया उद्योग वेगळे.आता सरकार म्हणते ४ लाख टन कांदा खरेदी केलेला आहे. असेलही त्याबद्दल खोलात जायला नको पंरंतु तुमचा ४ लाख टनातील आज रोजी किती सडला,किती विकला व आज किती शिल्लक आहे याची सरकारनेआकडेवारी सांगावी सरकार म्हणते २५ रु. दराने कांदा आम्ही जनतेला देत आहोत. कृपया आतापर्यंत कोठे व आणि कोणाला दिला ? यांचा खुलासा करावा. निव्वळ आमची दिशाभुल करण्याचा प्रयत्न होत आहे.
आपण सरकारचे सर्व म्हणने खरे समजु पंरतु जर देशात ५५ ते६० हजार टन कांदा खाण्यासाठी लागतो तर त्याचा कांदा ४ दिवसात संपेल मग पुढे काय ?
माझ्या माहितीप्रमाणे सरकारने काही कांदा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेला आहे. ते ऐवढा आहे कि देशाची १५०
कोटी जनता एका जेवनात संपुन टाकेल. तेव्हा हा निव्वळ दिशाभुल आणि खोटाडेपणा आहे. कांदा उत्पादक शेतकरी मित्रोहो घाबरण्याचे आजीबात कारण नाही.मी रोज शेतकऱ्यांना सांगत आहे, ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी जरूर उन्हाळी (रब्बी) कांदा लागवड करावी कारण कमीत कमी १ वर्ष कांदा दर कमी होणार नाहीत.
आजुनही वेळ गेलेली नाही नोव्हेंबर,
डिसेंबर,जानेवारी २०२४ पर्यंत
|आपण लागवड करू शकतो.खरे तर कांदा हा जीवनावश्यक वस्तुमध्ये टाकणे म्हणजे खुळेपणाचे लक्षण आहे. ज्यांना कांदा खाणे परवडत नाही. त्यांनी काही काळ नाही खाल्ला तरी काही फरक पडत नाही परंतु कांद्याचे भाव वाढले की,सरकारची झोप उडते आणि वेगवेगळ्या उपाययोजना करून भाव पाडण्याचा प्रयत्न केला जातो.१९९८ साली दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका होत्या त्याकाळच्या विद्यमान मुख्यमंत्री शीलाताई दिक्षीत यांचे सरकार कांदा भाव वाढी मुळे गडगडले तेव्हापासुन सरकारने आणि राजकिय नेत्याने कांदा भाव वाढला की,घरका घेतलेला आहे. मग त्यासाठी निर्यात बंदी करणे,एमएपी वाढवणे निर्यात शुल्क वाढवणे अशी अनेक प्रकारच्या हत्यारे वापरली जातात आणि ती निव्वळ
शेतकऱ्याच्या मुळावर घाव घालत असतात.इकडे शेतकरी कर्जाच्या बोज्या मुळे आत्महात्या करीत आहे.आज त्याचे
किती प्रमाण वाढले आहे हे आकडेवारी वरून लक्षात येते परंतु माय-बाप सरकारला त्याचे काही एक सोईरसुतक नाही.शेती मालाला थोडा भाव आला की काही तरी कारण काढुन भाव पाडले जातात.आम्ही अन्नधान्य आयात करू अशा प्रकारच्या वल्गना केल्या जातात. भिती दाखवली जाते.असो तरी कांदा उत्पादकाने घाबरण्याचे अजीबात कारण नाही. कांद्याचे भाव सरकार ठरवत नाही.तो विकणारा व खाणारा यांच्यातील मेळ आहे. सरकार कारण नसतानामध्ये हस्तक्षेप करते याचे कारण आपणास माहित आहे.तेव्हा ज्याच्याकडे पाणी आहे.त्यांनी आवश्य कांदा लावावा यावर्षी दुष्काळ असल्यामुळे पाण्याची टंचाई आहे.त्यामुळे सर्वत्र कांदा लागवड होणार नाही.तेव्हा परत एकदा शेतकरी बांधवाना नम्र पणे सांगु इच्छितो की, कांदा भावाबद्दल सरकार काहीही करू शकत नाही.सरकारने सर्वप्रकारचे हत्यारे वापरून पाहिली आणि ती आता बोथट झालेली आहे.मित्रहो जरी
निर्यात बंदी झाली तरी देशा अर्तगत टंचाईच्या काळात असलेली मागणी आपण पुर्ण करू शकत नाही.त्यामुळे वर्षभर कांद्याचे बाजार टिकुन राहतील ? दुसरे असे की,बातम्या ऐकुण शेतकरी भराभर कांदा बाजारात आणत आहे तरी असे करू नका,थोडा-थोडा माल काढा म्हणजे आपल्याला तेजी मंदीचा लाभ मिळेल.
*बाबासाहेब पिसोरे*
(कृषीभूषण)
महाराष्ट्र राज्य,
कांदा उत्पादक व निर्यातदार शेतकरी
(मो.नं.९८२२९९१११२)
********************
0 टिप्पण्या